क्रिकेटविश्वात खळबळ! गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी

On: April 24, 2025 11:08 AM
Gautam Gambhir
---Advertisement---

Gautam Gambhir l टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला ‘ISIS कश्मीर’ या दहशतवादी संघटनेने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. काश्मीरच्या पहलगाममध्ये (Pahalgam attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही धमकी मिळाली आहे. गंभीरने दिल्लीत पोलिसांत तक्रार दाखल करत आपल्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची मागणी केली आहे. या घटनेमुळे क्रिकेटविश्वात चिंता व्यक्त केली जात आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी गंभीर पुन्हा तयारीला :

गंभीर सध्या आयपीएलच्या ब्रेकवर असून, काही दिवसांपूर्वीच तो युरोप दौऱ्यावर गेला होता. मात्र धमकीनंतर गंभीरने त्वरित दिल्लीत एफआयआर दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.

आयपीएलनंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार असून, प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर पुन्हा आपली जबाबदारी पार पाडणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर गंभीरच्या प्रशिक्षकपदाकडे क्रिकेट चाहत्यांचे मोठे लक्ष लागले आहे.

Gautam Gambhir l 2027 पर्यंत गंभीरचा करार :

गौतम गंभीरचा (Gautam gambhir) भारतीय संघासोबत 2027 च्या वर्ल्ड कपपर्यंतचा करार आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने (team india) आयसीसी विजेतेपद पटकावलं आहे.

मात्र, नुकत्याच पार पडलेल्या WTC फायनलमध्ये भारताला यश मिळू शकले नाही. त्यामुळे आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी संघ आणि प्रशिक्षक दोघांनाही मोठा कस लागणार आहे.

News Title: Gautam Gambhir Receives Death Threat from ‘ISIS Kashmir’, Files Police Complaint, Seeks Security

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now