गणेशोत्सवाला एसटीने कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

Ganpati Festival 2024 | गणेशोत्सव (Ganpati Festival 2024) हा सण कोकणभागातील लोकांसाठी फार महत्त्वाचा सण आहे. गणेशोत्सव आणि शिमगा या दोन्ही सणांचं कोकणात फार मोठं महत्त्व आहे. कोकणातील अनेक लोकं ही मुंबई, पुणे शहरासारख्या भागात रोजगारासाठी आलेले असतात. तेच गणेशोत्सवासाठी तसेच शिमग्याला कोकणात जाताना दिसतात. गणेशोत्सव काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. (Ganpati Festival 2024)

मुंबई सारख्या शहरातून कोकणाकडे अनेक चाकरमानी जाताना दिसतात. यासाठी एसटी महामंडळाने कोकणात जाणाऱ्या गाड्यांसाठी आरक्षण सुरू केलं आहे. तसेच गणेशोत्सवात जादा एसटीच्या फेऱ्या देखील चालवण्यात येणार आहेत. (Ganpati Festival 2024)

एसटी महामंडळाकडून कोकणात जाणाऱ्या गाड्यांसाठी आरक्षण

दरम्यान कोकणात जाण्यासाठी गणेशोत्सव काळात मोठी गर्दी दिसते. गणेशोत्सवासाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी राहिला आहे. यासाठी आता एसटीच्या आरक्षणासाठी विशेष माहिती दिली आहे. यासाठी एसटी महामंडळाचे आरक्षण हे 4 जुलैपासून सुरू होत आहे. याच चाकरमान्यांना ग्रुपपासून ते वैयक्तिक आरक्षणही करता येणार आहे. तसेच कोकणात जाण्यापासून परतीच्या प्रवासाबाबतही गुरूवारपासून आरक्षण सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Ganpati Festival 2024)

कोकणासह राज्यातील सर्व विभागांमध्ये गणेशोत्सव काळासाठी नियमित आणि विशेष गाड्यांचे आरक्षण गुरुवारपासून खुले होणार आहे. सध्या धावणाऱ्या एसटी बस या वेळापत्रकानुसार सुटतील. त्यासोबत मुंबई सेंट्रल, परळ, पनवेल आणि कुर्ला नेहरूनगर या ठिकाणाहून 2 आणि 3 सप्टेंबरपासून जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. राजापूर, कणकवली, विजयदुर्ग, भालावली, दापोली आणि देवगड जादा एसटी फेऱ्या चालवण्यात येणार आहे. या जादा गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक लवकर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती एसटी अधिकाऱ्य़ांनी दिली आहे.

संकेतस्थळ आणि अॅपच्या माध्यमातून करता येणार बुकींग

कोकणात अनेक मंडळी जात असतात. यासाठी आता एसटीचं आरक्षित बुकींग करण्यासाठी वेबसाईट तसेच अॅपचा देखील वापर करता येतो. त्यासाठी महामंडळाच्या अॅप आणि महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटी गाड्यांचे आरक्षण 60 दिवसाआधी खुले करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. 30 दिवस आधी गाड्यांचे आरक्षण करण्याची मुभा होती. याकाळात प्रवाशांची गर्दी पाहता गाड्यांचा आणि प्रवाशांचा प्रवास कोणतीही हानी न होता व्हावा असं एसटी महामंडळाने म्हटलं आहे.

News Title – Ganpati Festival 2024 Konkan Reservation St Bus Start From 4th July

महत्त्वाच्या बातम्या

जुलै महिन्यात लाँच होणार ‘या’ भन्नाट कार; पाहा यादी

सावधान! हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी

पुण्यात आढळले झिकाचे 7 रुग्ण; काय आहेत लक्षणं

चांदी सूसाट तर सोन्याने टाकला दरवाढीचा गिअर, काय आहेत आजच्या किंमती?

तुमचं इंस्टाग्राम हॅक झालं आहे का? हे तपासण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा