उद्या अनंत चतुर्दशीला पुण्यातील वाहतुकीत बदल! पीएमपीच्या बसस्थानकांचे स्थलांतर

On: September 5, 2025 4:14 PM
Pune Traffic Diversion
---Advertisement---

Pune Traffic Diversion | पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान स्वारगेट आणि डेक्कन परिसरातील काही प्रमुख रस्ते पूर्णपणे बंद राहणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) आपल्या ५ महत्त्वाच्या बसस्थानकांचे तात्पुरते स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणते रस्ते राहणार बंद? :

अनंत चतुर्दशीला मिरवणुका मोठ्या संख्येने निघणार असल्याने छत्रपती शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता आणि टिळक रस्ता हे मार्ग पूर्णतः वाहतुकीसाठी बंद राहतील. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. (Pune Traffic Diversion)

Pune Traffic Diversion | बसस्थानकांचे नवीन ठिकाण :

शाहू महाराज स्थानक : आता लक्ष्मी नारायण चौकात हलवले असून येथून सातारा रस्ता मार्गावरील बस सुटतील.

नटराज स्थानक : पर्वती पायथा येथे सुरू राहणार असून सिंहगड रस्त्यावरील बस याच ठिकाणावरून सुटतील.

स्वारगेट स्थानक : सोलापूरमार्गे धावणाऱ्या तसेच भवानी पेठ, नाना पेठकडे जाणाऱ्या बस आता वेगा सेंटर येथून सुटतील.

डेक्कन जिमखाना स्थानक : एसएनडीटी कॉलेजजवळ हलवण्यात आले असून, कोथरूड डेपो, माळवाडी आणि एनडीए मार्गे जाणाऱ्या बस येथून सुटतील.

प्रवाशांना आवाहन :

पीएमपी प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, गणेश विसर्जनाच्या दिवशी या बदलांची नोंद घेऊन आपले प्रवास नियोजन करावे. वाहतूक बंदीमुळे होणारी गैरसोय कमी करण्यासाठी ही तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.

News title : Ganesh Visarjan 2025: Pune Traffic Changes on Anant Chaturdashi | PMP Shifts 5 Bus Stations Temporarily

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now