एकनाथ शिंदेच्या मुलाला फायदा होण्यासाठी… भाजप आमदाराकडूनच शिंदेंना तडाखे

On: September 2, 2024 2:33 PM
CM Eknath Shinde Resign
---Advertisement---

Navi Mumbai l विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच आता तडाखे ऐरोलीतील भाजप आमदार गणेश नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मोठा आरोप केला आहे. कारण नवी मुंबई महापालिकेमध्ये नव्याने 14 गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. मात्र ही गावे कल्याण लोकसभा मतदारसंघात येत आहेत. त्यामुळे निवडणुकीमध्ये श्रीकांत शिंदे यांना त्यांचा फायदा व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही गावे समाविष्ट केली आहेत असा आरोप गणेश नाईक यांनी केला आहे.

आमदार गणेश नाईकांनी दिला थेट इशारा ;

निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी 14 गावे नवी मुंबई महापालिकेमध्ये समाविष्ट करण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला असा आरोप तडाखे ऐरोलीतील भाजप आमदार गणेश नाईक यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्यावेळी आमदार गणेश नाईक म्हणाले की, आम्ही दोघेही महायुतीत आहोत. मात्र अपशकुन नको म्हणून मी या निर्णयाला विरोध केला नाही असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

या 14 गावांतील खर्चाचा भार विनाकारण नवी मुंबईकरांवर येऊ देणार नाही. कारण तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी जो काही प्रस्ताव पाठवला आहे अगदी त्यानुसारच या गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यात यावा. मात्र जर कोणी जोर जबरदस्ती केली तर एक लाख नवी मुंबईकरांचा मोर्चा मुंबई महापालिकेवर व मुख्यालयावर मोर्चा काढू असा थेट इशारा नाईक यांनी दिला आहे.

Navi Mumbai l महापालिका आयुक्तांनी दिलेल्या नियमांचे पालन करावे :

नवी मुंबईत नव्याने समाविष्ट झालेल्या 14 गावांबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी क्रिस्टल हाऊस येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी गणेश नाईक म्हणाले की, माझा या गावांना कसलाही विरोध नाही. मात्र ही 14 गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी जो काही प्रस्ताव शासनाला पाठवला आहे त्याचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच या गावांच्या विकासासाठी पालिकेने शासनाकडे काही निधीची मागणी देखील केलेली आहे. तसेच तेथील अतिक्रमण हटवण्यास देखील सांगितले आहे, त्याचे काटेकोरपणे पालन करावे असे आमदार नाईक म्हणले आहेत.

याशिवाय ही सर्व कामे केल्यानंतरच या 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यात यावा. या
14 गावांचा आणि नवी मुंबईचा तसा भौगोलिक संबंध नाहीये. त्यामुळे त्यांना एका बाजूने नवी मुंबईत यायचे झाले तर ठाणे महापालिकेतील काही प्रभाग ओलांडावे लागणार आहेत, तसेच दुसऱ्या बाजूने प्रवेश करायचा असेल तर पनवेल महापालिकेच्या हद्दीचा वापर देखील करावा लागतो. तरीही शासनाने ही गावे नवी मुंबई पालिकेत समाविष्ट करण्याचा हट्ट कित्येक दिवसांपासून धरला आहे. मात्र याबाबत जोर जबरदस्ती केली तर ती खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही आमदार गणेश नाईक यांनी यावेळी दिला आहे.

News Title :  Ganesh Naik Allegation On CM Eknath Shinde

महत्वाच्या बातम्या-

राज्यातील भाजप नेत्यांकडून एकनाथ खडसेंची अवहेलना, मोठा निर्णय घेणार!

पुण्यात चाललंय तरी काय?, 12 तासात रंगला दुसऱ्या खुनाचा थरार

‘वनराज… तुला पोरं बोलवून ठोकतेच’; पोलिसांसमोर धमकी दिलेली ती कोण?

वनराज आंदेकर हत्या प्रकरणात पोलिसांना संशय, मोठी माहिती समोर

सणासुदीत सोने-चांदी स्वस्त होणार की महागणार? जाणून घ्या आजचा तोळ्याचा भाव

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now