बाप्पाच्या प्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त कोणता?, जाणून घ्या पूजेला लागणारे साहित्य व मंत्र

On: September 7, 2024 9:40 AM
Ganesh Chaturthi 2025
---Advertisement---

Ganesh Chaturthi 2024 | आज 7 सप्टेंबररोजी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. देशभरात मंडळे बाप्पाच्या स्वागतासाठी सजली आहेत. घरोघरी सुंदर सजावट करण्यात आली आहे. आज बाप्पाच्या प्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त कोणता असणार, पूजेसाठी कोणते साहित्य लागणार याबाबत या लेखात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. (Ganesh Chaturthi 2024 )

10 दिवस चालणाऱ्या या उत्सवात लाडक्या गणपती बाप्पाला विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात. या दिवशी गणेशाची पूजा केली जाते. तर, जाणून घेऊयात श्रीगणेश प्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त आणि मंत्र.

बाप्पाच्या स्थापनेची शुभ वेळ कोणती?

सूर्यास्तापूर्वी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे. गणेश पुराणानुसार, गणपतीचा जन्म चतुर्थी तिथी आणि चित्रा नक्षत्राच्या मध्यरात्री म्हणजेच दिवसाच्या उत्तरार्धात झाला होता. हा शुभ काळ सकाळी 11:20 पासून सुरू होणार आहे. आज 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11:03 वाजेपासून ते दुपारी 1:34 वाजेपर्यंत गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त असणार आहे. या मुहूर्तादरम्यान पूजा करणे फलदायी ठरेल.(Ganesh Chaturthi 2024 )

गणेश पूजेसाठीचे साहित्य-

गणेश चतुर्थीच्या पूजनामध्ये मातीची गणेश मूर्ती, चौरंग, केळीचे खांब, लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र, नवीन वस्त्र, धूप-अगरबत्ती, कापूर, मोदक, केळी, हळद-कुंकू, कलश, फळ, फुले, अक्षता, आंब्याच्या डहाळ्या, पंचामृत, सुपारी इत्यादी गोष्टींचा पूजेच्या सामग्रीमध्ये समावेश केला जातो.(Ganesh Chaturthi 2024 )

गणेश चतुर्थीची पूजा-

सर्व प्रथम सकाळी उठून स्नान करा. स्वच्छ कपडे घाला आणि पूजास्थान स्वच्छ करा. नंतर गणेश चतुर्थी तिथीला शुभ मुहूर्तावर बाप्पाची स्थापना घराच्या उत्तर, पूर्व किंवा ईशान्य भागात करावी. हे करत असताना ॐ गं गणपतये नम: मंत्रोच्चार करत पूजा करावी.बाप्पाच्या पूर्व दिशेला कळस ठेवा आणि आग्नेय दिशेला दिवा ठेवा. आता स्वतःवर पाणी शिंपडताना ॐ पुंडरीकाक्षय नमः या मंत्राचा जप करा. त्यानंतर बाप्पाला नमस्कार करून 3 वेळा पवित्र जल ग्रहन करून कपाळावर टीळा लावा.(Ganesh Chaturthi 2024 )

बाप्पाला तुपाचा दिवा लावा, दूध आणि पंचामृताने स्नान घाला आणि अष्टगंध व लाल चंदनाने गणेशाला टिळा लावा. हार फुले आणि पाने तसेच मोदकाचा नैवेद्य दाखवा. आरती करून स्वतःभोवती प्रदक्षिणा घाला आणि देवाला मनोभावे नमस्कार करा. या दरम्यान काही मंत्र उच्चारण देखील केले जाते.

गणेश मंत्र-

वक्रतुंड महाकाय, सूर्य कोटि समप्रभ निर्विघ्नम कुरू मे देव, सर्वकार्येषु सर्वदा।।
ॐ गं गणपतये नम:।
ॐ नमो हेरम्ब मद मोहित मम् संकटान निवारय-निवारय स्वाहा।
ॐ वक्रतुंडा हुं।
ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा।
सिद्ध लक्ष्मी मनोरहप्रियाय नमः।
ॐ श्रीं गं सौभाग्य गणपतये। वर्वर्द सर्वजन्म में वषमान्य नम:।।

News Title :  Ganesh Chaturthi 2024  shubha muhurta 
महत्वाच्या बातम्या-

आज ‘या’ 4 राशींवर राहील बाप्पाची कृपा, सर्व मनोकामना होतील पूर्ण

विनेश फोगाट राजकीय मैदान गाजवणार, कॉँग्रेसमध्ये प्रवेश करताच मिळालं विधानसभेचं तिकीट

गणपती बाप्पाच्या आगमनाने संकटे होतील दूर, ‘या’ राशींचे येणार सुवर्णदिवस

“… म्हणून आम्ही सारखे दिल्लीत जातो”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

‘किती वेळा नवरे बदलले तू…’; एकनाथ खडसे संतापले

Join WhatsApp Group

Join Now