Lord Ganesh | गणरायाला (Lord Ganesh) सनातन धर्मात प्रथम पूजनीय मानले जाते. गणपतीच्या कृपेने घरात सुख-समृद्धी नांदते. तसेच, भक्तांची सर्व विघ्न दूर होतात अशी मान्यता आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, मेष राशीच्या लोकांसाठी गणपतीचे हे दिवस फार खास असणार आहेत. भगवान गणेशाला या राशीचे लोक फार प्रिय आहेत. बाप्पा या राशीची सर्व कार्य अगदी निर्विघ्नपणे पूर्ण करतात. इतकंच नव्हे तर या राशीच्या जीवनात कधीच पैशांची कमतरता भासत नाही. तसेच करिअरमध्ये चांगली प्रगती होते.
बाप्पाला ‘या’ राशीचे लोक प्रिय असतात
आज मनासारख्या गोष्टी घडतील. त्यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटेल. अविवाहितांना आज खूश खबरी मिळण्याची शक्यता आहे. जवळच्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात वादळ येतील. त्यामुळे चिंता वाढेल.
तुमच्या रागावर आणि जीभेवर नियंत्रण ठेवा. कोणत्याही कायदेशीर गोष्टीत विचारपूर्वकच निर्णय घ्या. तरुणांनी करिअरवर अधिक फोकस द्यावा. आज उत्पन्न सामान्यच राहील. ऑफिसात वरिष्ठांशी समन्वय साधून काम करा.
मिथुन रास ही दुसरी रास भगवान गणेशाला प्रिय आहे. या राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यास भगवान गणपती यांची मदत करतात. या राशीचे लोक फार बुद्धिवान असतात. तसेच, येणाऱ्या संकटाचा सामना कसा करायचा हे त्यांना माहित असतं. समाजात यांचा मान-सन्मान वाढतो. गणेशाच्या कृपेने यांची बिघडलेली कामे ठीक होतात.
कुंभ राशीच्या लोकांना गणपती नेहमी सुखी आणि संपन्न ठेवतात. भगवान गणेश या राशीच्या लोकांना प्रत्येक संकटांपासून दूर ठेवतात. तसेच, तुम्हाला करिअरमध्ये योग्य उंची गाठण्यासाठी मदत करतात. दुसऱ्यांना मदत करणं हा यांचा स्वभाव असल्या कारणाने बाप्पा नेहमी यांच्या पाठीशी असतो.
महत्त्वाच्या बातम्या-
आयफोन 16 ‘या’ देशात मिळणार सर्वात स्वस्त!
घरी गणपती बाप्पाची स्थापना करत असाल तर ‘या’ वस्तू घरात चुकूनही आणू नका!
गणेशोत्सवाला गालबोट! मंडळाचे बॅनर लावणाऱ्या दोघांना BMW कारने चिरडलं
पुण्यातील ‘या’ भागात 10 दिवस दारू बंदी!…तर असं केल्यास कारवाई होणार
पावसाच्या सरींनी होणार गणरायाचं स्वागत; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी






