मरणाच्या भीतीने गजा मारणेने सिटीप्राईड कोथरुडमध्ये…, नवं CCTV फुटेज पोलिसांच्या हाती

On: March 1, 2025 6:59 PM
gaja marne
---Advertisement---

Gaja Marne | पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे (Gaja Marne) याने विरोधी टोळीच्या हल्ल्याच्या भीतीमुळे आपल्या ३६ साथीदारांसह कोथरुडमधील सिटी प्राईड सिनेमागृहात चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. या घटनेनंतर काही तासांतच भेलकेनगर येथे आयटी अभियंता देवेंद्र जोग (Devendra Jog) यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. पोलिसांनी सिटी प्राईड कोथरुड येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांनी एकूण ३६ तिकीटे खरेदी केल्याचे आढळले.

हल्ल्याच्या भीतीने मोठा घोळका-

गजा मारणे (Gaja Marne) विरोधी टोळीच्या हल्ल्याच्या भीतीमुळे नेहमीच मोठ्या घोळक्यात फिरत असतो. त्याला कुठेही जायचे असेल तर आपल्या टोळीतील लोकांना सोबत घेतो. त्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी देखील तो मोठ्या संख्येने साथीदारांसह गेला होता. या टोळीने दोन फॉर्च्युनर, एक अन्य कार आणि ७-८ दुचाकींवरून सिटी प्राईड कोथरुड येथे प्रवेश केला.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांचे जबाब ताब्यात घेतले आहेत. त्यातून गजा मारणेची (Gaja Marne) टोळी चित्रपटगृहात गेल्याचे स्पष्ट झाले असून, मारहाणीच्या घटनेपूर्वीच त्यांची हालचाल संशयास्पद होती.

गजा मारणेच्या हालचालींवर लक्ष-

आयटी अभियंता देवेंद्र जोग यांना मारहाण करण्यापूर्वी गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांची हालचाल संशयास्पद होती. त्यामुळे पोलिसांनी सिटी प्राईड कोथरुड आणि इतर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या माध्यमातून मारहाण प्रकरणातील मुख्य चार आरोपींना मदत करणारे इतर सहकारी कोण होते, याचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, गजा मारणेच्या टोळीवर पोलिसांचे लक्ष असून, त्यांच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

News Title : gaja marne new cctv footage in cops hand

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now