BCCI कडून टीम इंडियाचं वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या सर्वकाही

On: April 1, 2025 10:58 AM
Piyush Chawla Retirement
---Advertisement---

आयपीएल 2025 च्या धामधुमीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने महिला क्रिकेटप्रेमींना एक आनंददायक बातमी दिली आहे. वूमन्स टीम इंडिया लवकरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून, त्यांच्यासाठी 3 टी-20, 3 एकदिवसीय आणि 1 कसोटी सामना असलेलं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

BCCI ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म “एक्स” वरुन हे अधिकृत वेळापत्रक शेअर केलं आहे. टीम इंडियाचा हा दौरा १५ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणार आहे.

टी-20 मालिकेने होणार सुरुवात :

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा टी-20 मालिकेने सुरू होणार आहे.

पहिला सामना – 15 फेब्रुवारी 2026, सिडनी क्रिकेट ग्राउंड

दुसरा सामना – 19 फेब्रुवारी 2026, मानुका ओव्हल, कॅनबेरा

तिसरा सामना – 21 फेब्रुवारी 2026, एडलेड ओव्हल

हे सर्व सामने रात्री खेळवले जाणार असून, टी-20 मालिकेत दोन्ही संघांची आक्रमकता पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.

वनडे मालिकेला 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर सुरुवात :

टी-20 मालिकेनंतर दोन दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे.

पहिला वनडे – 24 फेब्रुवारी, ब्रिस्बेन

दुसरा वनडे – 27 फेब्रुवारी, होबार्ट

तिसरा वनडे – 1 मार्च, मेलबर्न

हे तिन्ही सामने डे-नाईट फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहेत.

BCCI च्या या निर्णयामुळे महिला क्रिकेटला अधिक चालना मिळेल, असा विश्वास क्रिकेट तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध मालिकेचा अनुभव भारतीय महिला संघाला आगामी स्पर्धांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

News Title : Team India Women’s Australia Tour 2026: Full Schedule Announced – T20, ODI & Pink Ball Test

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now