France President | फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये मॅक्रॉन यांची पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन त्यांना थोबाडीत मारताना दिसत आहे, तर इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) आपला चेहरा लपवताना दिसत आहेत. या घटनेमुळे फ्रान्सचे राष्ट्रपती भवन द एलिसी पॅलेसमध्येही गोंधळ निर्माण झाला.
इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा व्हिडीओ व्हायरल
हा व्हिडीओ व्हिएतनामची राजधानी हनोईमधील आहे, जिथे मॅक्रॉन पत्नी ब्रिजिट मॅक्रॉनसह राजकीय दौऱ्यावर आहेत. व्हिडीओ रविवारचा असल्याचे बोलले जात आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) हे फर्स्ट लेडीसह हनोईमध्ये पोहोचताच विमानाचा दरवाजा उघडतो, आणि याच वेळी ब्रिजिट मॅक्रॉन राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्या चेहऱ्यावर मारताना आणि त्यांना ढकलताना दिसत आहेत.
याच वेळी, इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या लक्षात येते की, कॅमेरामन आणि मीडिया बाहेर उभा आहे. तेव्हा ते थोडे गडबडतात, परंतु लगेचच स्वतःला सावरत हसून माध्यमांकडे हात हलवतात आणि पुन्हा विमानात जातात. यानंतर, ते विमानातून खाली उतरले, मात्र यावेळी ते एकमेकांचा हात धरून खाली उतरले नाहीत. महत्वाचे म्हणजे, त्यावेळी इमॅन्युएल मॅक्रॉन थोडे अस्वस्थही वाटत होते, ज्यामुळे व्हिडिओतील घटनेला अधिक बळकटी मिळते.
France President ला बायकोने सगळ्यांसमोर मारली थोबाडीत
फ्रेंच राष्ट्रपती राजवाडा एलिसी पॅलेसने सुरुवातीला विमानात असे काही घडले असल्याचे नाकारले होते. मात्र नंतर, हे जोडप्यातील किरकोळ भांडण होते, असे स्पष्टीकरण देण्यात आले. एलिसी हाऊसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन एकमेकांची थट्टा करत होते आणि त्यांची छेड काढत होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या एका जवळच्या मित्राने याला पती-पत्नीमधील सर्वसाधारण भांडण असे म्हटले आहे, ज्यामुळे हा वाद कौटुंबिक असल्याचे दर्शवले गेले.
खरे तर, इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्रिजिट मॅक्रॉन यांची प्रेम कहाणी प्रसिद्ध आहे. दोघांमध्ये २४ वर्षांचे अंतर आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन १५ वर्षांचे असताना ३९ वर्षीय ब्रिजिट यांच्या प्रेमात पडले होते. ब्रिजिट आधीच विवाहित होत्या आणि त्यांना तीन मुलेही होती. ब्रिजिट मॅक्रॉन यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की त्या एका कॅथोलिक शाळेत शिक्षिका होती आणि इमॅन्युएल त्यांचा विद्यार्थी होता. ब्रिजिट यांनी पहिल्या पतीला घटस्फोट दिला आणि दोघांनीही २००६ मध्ये लग्न केले. त्यावेळी इमॅन्युएल मॅक्रॉन २९ वर्षांचे होते.






