माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं निधन!

On: October 27, 2023 2:56 PM
---Advertisement---

अहदमनगर | शेतकरी, कामगार, ऊसतोड मजूर आणि बेरोजगार युवकांचे प्रश्न मांडणारे माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे (Babanrao dhakne ) याचं निधन झालं आहे. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी आखेराचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर साईदीप या खासगी रुग्णालयात उपचार चालू होते. आज दुपारी एक वाजता त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी, त्यांच्या हिंद वसतीगृह या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. उद्या दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत.

बबनराव ढाकणे संघर्ष योद्धा म्हणून परिचित होते. ते जून्या फळीतील राजकारणी होते. पंचायत समिती सदस्य ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. ते तिनवेळा विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य आणि लोकसभेचे सदस्य राहिले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राज्यात अनेक खात्याची जबाबदारी त्यांनी संभाळली आहे.

मराठवाड्याच्या राजकारणावर त्यांची पकड होती. अहमदमनगर आणि बीड जिल्हात त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर ते कायम आक्रमक भूमिका घेत असायचे. गेल्या दोन तिन आठवड्यापांसून ते आजारी होते. ते न्यूमोनियाने त्रस्त होते. काल रात्री हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने अहमदमनगर आणि बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. संघर्ष योद्धा हरवल्याची भावना लोकांकडून व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp Group

Join Now