माजी खासदाराच्या पुतण्याने केली आत्महत्या!

On: October 16, 2024 11:51 AM
Bengaluru Doctor Crime
---Advertisement---

Suicide News l भाजपच्या माजी खासदाराच्या पुतण्याने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबई येथे वास्तव्यास असलेले भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार संगमलाल गुप्पा यांच्या 21 वर्षीय पुतण्याने काल दुपारी आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

माजी खासदाराच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, या 21 वर्षीय तरुणाने वास्तव्यास असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून खाली उडी मारली. त्यानंतर त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. मृत तरुणाचं नाव सागर रामकुमार गुप्ता असं आहे. तसेच हा तरुण मुंबईत अभियांत्रिकीचं शिक्षण घेत होता. मात्र तो त्याच्या कुटुंबासह अंधेरी पूर्वेकडील अंबुजवाडी या परिसरातील हरी दर्शन इमारतीमध्ये राहत होता.

मृत सागर रामकुमार गुप्ता याने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे अंधेरी पोलिसांनी सांगितले आहे. तसेच या धक्कादायक कृत्याने भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार संगमलाल गुप्पा यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Suicide News l आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट :

यासंदर्भात पोलिसांनी माहिती दिली आहे. पोलीस म्हणाले, मृत सागर हा दुपारी महाविद्यालयातून घरी परतला. मात्र त्याने घरी आल्यावर कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी कसलीही बातचीत केली नाही. त्यानंतर तो सहाव्या मजल्यावरील ‘डक्ट एरिया’ मध्ये गेला आणि तिथून त्याने खाली उडी मारली.

मात्र त्यावेळी काही पादच्याऱ्यांनी त्याचा मृतदेह पाहून आरडाओरड केली. तसेच त्यांनीच पोलिसांना या संपूर्ण घटनेची माहिती दिली आणि ते सागरला जवळच्या रुग्णालयात देखील घेऊन गेले. त्यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मात्र सागरने नेमकी आत्महत्या का केली याची अदयाप माहिती मिळालेली नाही. तसेच या घटनेचा पुढील तपस अंधेरी पोलीस करत आहे.

News Title :former bjp mp nephew jumps to death from mumbai

महत्वाच्या बातम्या-

विधानसभेपूर्वी रुपाली चाकणकरांची मोठी खेळी!

आज राज्यातील ‘या’ ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता!

संतापजनक! ठाण्यात बदलापूरची पुनरावृत्ती, नराधम निघाला ‘या’ पक्षाचा पदाधिकारी

कोजागिरी पौर्णिमेला 3 राशींचं भाग्य उजळणार, नोकरी ते विवाहातील सर्व अडथळे दूर होणार!

आज कोजागिरी पौर्णिमा, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now