विदर्भात भाजपला मोठं खिंडार, माजी आमदार कॉँग्रेसमध्ये करणार घरवापसी?

On: September 13, 2024 2:51 PM
Former BJP MLA Gopaldas Agrawal to join Congress
---Advertisement---

BJP | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मात्र, त्यापूर्वीच भाजपला धक्क्यावर धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वीच कोल्हापूरचे भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय. अशात भाजपला विदर्भातून दूसरा मोठा धक्का बसला आहे. (BJP )

गोंदियामधील माजी आमदार गोपालदास अग्रवाल (Gopaldas Agrawal) हे काँग्रेसमध्ये घरवापसी करणार आहेत. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधत याची घोषणा केली. मी भाजपात असताना पक्षाने मला सोडून विनोद अग्रवाल यांना अधिक महत्व दिलं, त्यामुळे भाजप सोडण्याचा मला निर्णय घ्यावा लागला, असं गोपालदास अग्रवाल म्हणाले आहेत.

माजी आमदार काँग्रेसमध्ये घरवापसी करणार

त्यामुळे आता गोंदिया विधानसभेत काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल विरुद्ध भाजपचे विनोद अग्रवाल अशी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजच ते कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपला हा दूसरा मोठा धक्का बसला आहे. (BJP )

माजी आमदार गोपाल अग्रवाल यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आज 13 सप्टेंबरला काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याची माहिती स्वत: गोपाल अग्रवाल यांनी दिली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान ते भाजपमध्ये दाखल झाले होते. अशात ते पुन्हा घरवापसी करणार आहेत.

विदर्भात भाजपला मोठा धक्का

यापूर्वी माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.आता गोपाल अग्रवाल यांनी देखील विधानसभा निवडणुकीपूर्वीच पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने पूर्व विदर्भात भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.  (BJP )

News Title –  Former BJP MLA Gopaldas Agrawal to join Congress

महत्त्वाच्या बातम्या-

दहा हजारांपेक्षा कमी किंमतीत 5G स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत, फीचर्स

आनंदवार्ता! दमदार बॅटिंगनंतर सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या लेटेस्ट दर

हार्दिक पांड्याच्या आयुष्यात नव्या मुलीची एन्ट्री?, नताशा म्हणाली…

आज ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, उर्वरित भागात काय आहे स्थिती?

शेअर बाजारात नवा स्कॅम; ‘या’ व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून होतेय फसवणूक

Join WhatsApp Group

Join Now