Foods for Diabetes and BP | पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. या काळात साथीचे रोग लवकर पसरतात. त्याचबरोबर शरीराची प्रतिकार क्षमता देखील कमी होते. त्यामुळे आरोग्य सांभाळणे गरजेचे बनते. पावसाळ्यात काही पालेभाज्या असतात, ज्याचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे बऱ्याच जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब या समस्या जाणवतात. तुम्हाला या लेखात 5 पदार्थांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे मधुमेह आणि उच्च रक्तदाब नेहमी कंट्रोलमध्ये राहील. तसेच, वजन कमी करण्यासही फायदेशीर ठरेल. (Foods for Diabetes and BP )
‘या’ 5 पदार्थांचा आहारात करा समावेश
पालक : पालकची भाजी हा तुमच्या आहाराचा भाग असावा. त्यात लोह, कॅल्शियम आणि अँटी-ऑक्सिडेंट्ससह जीवनसत्त्वे ई, सी आणि के असतात, ज्यामुळे शरीराला भरपूर प्रतिकारशक्ती मिळते. या हिरव्या पालेभाज्यामध्ये असलेले फायबर आणि पाणी वजन कमी करण्यास मदत करते. तसेच यामध्ये आढळणारे नायट्रेट नावाचे संयुग रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
बदाम : यामध्ये मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात आढळते, त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. याचे सेवन केल्यास हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. यामध्ये फायबरचे (Foods for Diabetes and BP )प्रमाण जास्त असल्याने वजन कमी करणे आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हे फायदेशीर मानले जाते.
हिरवे मूग : तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या मूगाचाही समावेश करू शकता.हिरवे मूग खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. हे शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी काम करते. यामुळे हृदयाच्या आजारांपासून बचाव होतो. कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे त्याचे सेवन साखरेची पातळी देखील नियंत्रित करते
ओट्स : यामध्ये मँगनीज, फॉस्फरस, मॅग्नेशियम, तांबे, लोह आणि जस्त असते. त्यात बीटा-ग्लुकन नावाचे विरघळणारे फायबर असते, जे खराब कोलेस्ट्रॉल आणि साखरेची(Foods for Diabetes and BP ) पातळी कमी करते.
नाचणी : नाचणी मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर आणि फायटोन्यूट्रिएंट्सचा चांगला स्रोत आहे. नाचणी ट्रायग्लिसराइड्स, एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब कमी करते. नाचणीमध्ये अँटिऑक्सिडंट्स देखील भरपूर असतात जे मधुमेह आणि हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरते.
News Title : Foods for Diabetes and BP
महत्वाच्या बातम्या-
‘या लोकांसोबत तुला झोपायला लागेल’, सई ताम्हणकरच्या खुलाशाने खळबळ!
“..याची किंमत मोजावी लागली”; घटस्फोटाच्या चर्चेवर अखेर अभिषेकनं सोडलं मौन
बीएसएनएल लाँच करणार 200MP कॅमेरा असलेला 5G फोन! काय आहे यामागचं सत्य
लग्नाच्या 24 वर्षांनी अक्षय कुमारचा पत्नी ट्विंकलबद्दल धक्कादायक खुलासा!
गडकरींच्या बालेकिल्ल्यातच मनसेचा राडा; आता थेट टोलनाकाच फोडला






