2026 मधील पहिलं सूर्यग्रहण ‘या’ दिवशी, जाणून घ्या वेळ आणि ठिकाण

On: November 10, 2025 10:27 AM
Surya Grahan 2026
---Advertisement---

Surya Grahan 2026 | वर्ष 2026 च्या सुरुवातीलाच आकाशात दुर्मिळ खगोलीय घटना घडणार आहे. फेब्रुवारी महिन्यात नव्या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण होणार असून काही मिनिटांसाठी दिवसाच्यादिवशी अंधार पसरलेला दिसणार आहे. हे दृश्य पृथ्वीवरील काही भागातून दिसणार आहे. खगोलशास्त्रज्ञ आणि खगोलप्रेमींसाठी हा दिवस अत्यंत खास असणार आहे.

सूर्यग्रहण ही एक अशी घटना आहे, जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये येतो आणि सूर्याचा काही भाग झाकला जातो. या वेळी काही मिनिटांसाठी सूर्यप्रकाश कमी होतो आणि वातावरणात अंधाराचे साम्राज्य पसरते. 2025 मध्ये दोन सूर्यग्रहण झाली होती, मात्र त्यापैकी एकही भारतात दिसले नव्हते. आता 2026 मध्येही अशीच परिस्थिती दिसणार आहे. (Surya Grahan 2026)

17 फेब्रुवारीला ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’, भारतात नाही दर्शन :

हवामान खात्याच्या माहितीनुसार, 17 फेब्रुवारी 2026 रोजी हे सूर्यग्रहण होणार असून हे कंकणाकृती सूर्यग्रहण (Annular Solar Eclipse) असेल. यावेळी सूर्याभोवती अग्नीचे वलय दिसेल — म्हणजेच सूर्याचा मध्यभाग झाकला जाईल आणि कडा उजळून दिसतील. हे दृश्य अत्यंत आकर्षक आणि दुर्मिळ असते.

हे सूर्यग्रहण अंटार्क्टिका, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक आणि दक्षिण महासागराच्या काही भागातून दिसेल. परंतु, भारतात हे ग्रहण दिसणार नाही, त्यामुळे देशातील नागरिकांना प्रत्यक्ष दर्शन घेता येणार नाही.

Surya Grahan 2026 | काही मिनिटांसाठी दिवसा होणार पूर्ण अंधार :

सूर्यग्रहणाच्या वेळी काही मिनिटांसाठी पृथ्वीवर संपूर्ण अंधार पसरतो. 17 फेब्रुवारीच्या या ग्रहणावेळी अंदाजे 2 मिनिटे 1 सेकंद सूर्याचा प्रकाश पूर्णपणे झाकला जाणार आहे. दिवसा अंधार होण्याचा हा अनुभव खगोलप्रेमींसाठी विस्मयकारक ठरेल.

ग्रहणादरम्यान सूर्याच्या अवतीभोवती प्लाझ्माच्या हालचाली, प्रकाशाचे विचित्र नमुने आणि वातावरणातील रंगबदल हेही अनुभवायला मिळतात. त्यामुळे जगभरातील खगोलशास्त्रज्ञ या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

2026 मध्ये दोन सूर्यग्रहण, दुसरे 12 ऑगस्टला :

2026 मध्ये एकूण दोन सूर्यग्रहण होतील. पहिले ग्रहण 17 फेब्रुवारीला तर दुसरे 12 ऑगस्टला होणार आहे. दोन्हीही ग्रहणं भारतातून दिसणार नाहीत. दक्षिण गोलार्धातील काही देशांमध्ये मात्र हे दृश्य स्पष्टपणे पाहायला मिळेल.

भारतात सूर्यग्रहणाच्या काळात पारंपरिक श्रद्धेनुसार सुतककाल पाळला जातो. मंदिरांचे दरवाजे बंद ठेवले जातात आणि लोक उपवास किंवा ध्यान करतात. मात्र, हे ग्रहण भारतात न दिसल्याने देशात सुतकाचा कालावधी लागू होणार नाही.

News Title: First Solar Eclipse of 2026: February 17 Annular Surya Grahan — Full Darkness for 2 Minutes!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now