पुणे हादरलं! चाकणमध्ये भरदिवसा झालेल्या गोळीबाराने एकच खळबळ

On: January 20, 2025 4:06 PM
Pune Crime
---Advertisement---

Pune Crime l पुण्याच्या चाकण परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत स्टील कंपनी मालकावर गोळीबार झाला असून, गोळी त्यांच्या पोटात लागली आहे. या गोळीबारानंतर आरोपींनी (Accused) घटनास्थळावरून पळ काढला.

चाकण औद्योगिक वसाहतीत (Chakan Industrial Area) ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपासाला (Investigation) सुरुवात केली आहे.

कंपनीबाहेर (Outside Company) उभे असताना दुचाकीस्वारांकडून (Bike Riders) बेछूट गोळीबार :

मिळालेल्या माहितीनुसार, कैलास स्टील कंपनीच्या (Kailas Steel Company) मालकावर हा गोळीबार झाला आहे. कंपनी मालक कंपनीबाहेरच उभे असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार (Indiscriminate Firing) केला.

या गोळीबारात एक गोळी कंपनी मालकाच्या पोटात लागल्याने ते गंभीर जखमी (Seriously Injured) होऊन जमिनीवर (Ground) कोसळले.

Pune Crime l कर्मचाऱ्यांनी (Employees) मालकाला रुग्णालयात (Hospital) केले दाखल :

या घटनेनंतर कंपनीतील कर्मचाऱ्यांनी लगेचच कंपनी मालकाला रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांकडून (Doctors) उपचार सुरू आहेत.

गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे चाकण औद्योगिक वसाहतीत भीतीचे वातावरण पसरले आहे.

News Title : Firing on steel company owner in Chakan, Pune

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now