Firing in Maval l पुणे (Pune) जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील देहूरोडच्या गांधीनगर भागात एका धक्कादायक घटनेत गोळीबार झाला. देहूरोड येथे एका वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान सराईत गुन्हेगारांनी गोळीबार केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
गोळीबारात एकाचा बळी :
या गोळीबारात विक्रम रेड्डी (Vikram Reddy) नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर नंदकिशोर यादव (Nandkishore Yadav) गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री सुमारे ११:५६ वाजता विक्रम रेड्डी (Vikram Reddy) आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना, शाबीर आणि फैजल नावाच्या गुन्हेगारांनी त्यांच्यावर गोळीबार केला. नंदकिशोर यादव (Nandkishore Yadav) यांना दगडफेक करून जखमी करण्यात आले. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या विक्रम रेड्डी (Vikram Reddy) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Firing in Maval l वाढदिवसाच्या कार्यक्रमात वाद :
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी नंदकिशोर यादव (Nandkishore Yadav) यांच्या पुतणीचा वाढदिवस साजरा होत होता. त्यासाठी रस्त्याच्या कडेला मंडप टाकण्यात आला होता. जेवणाचेही आयोजन केले होते. त्याचवेळी, फैजल आणि शाबीर शेख (Shabir Shaikh) दुचाकीवरून तिथे आले आणि रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्यावरून त्यांनी वाद घातला. शाबीर आणि फैजलने नंदकिशोर (Nandkishore Yadav) यांना खुर्चीने मारहाण केल्याने त्यांच्या नाकाला दुखापत झाली.
दरम्यान, नंदकिशोर यांचा मित्र विक्रम रेड्डी (Vikram Reddy) वाद मिटवण्यासाठी मध्ये पडला. याचा राग मनात धरून आरोपींनी विक्रमवर गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेल्या विक्रमला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात आरोपी फैजल आणि शाबीर गोळीबार करताना दिसत आहेत. देहूरोड पोलीस (Dehurod Police) ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना पकडण्यासाठी तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.






