मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

On: January 9, 2025 11:24 AM
FIR against Manoj Jarange Patil
---Advertisement---

Manoj Jarange | मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange ) यांच्याविरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्री धनंजय मुंडे आणि ओबीसी समाजाविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

नेनकं काय घडलं होतं?

जरांगे पाटील यांनी परभणी येथे केलेल्या वक्तव्यामुळे ओबीसी समाजात तीव्र संताप निर्माण झाला होता. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन पुकारलं होतं.

बुधवारी पाथर्डी शहरात रास्ता रोको आंदोलन पार सुद्धा पडलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जरांगे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

आंदोलकांच्या मागणीनंतर गुन्हा दाखल-

सामाजिक कार्यकर्ते किसन महादेव आव्हाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी जरांगे पाटील यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. जरांगे पाटील यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. गुन्हा दाखल झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिले. (Manoj Jarange )

News Title :  FIR against Manoj Jarange Patil

महत्वाच्या बातम्या –

शेतकऱ्यांसाठी आले कांद्याचे नवे वाण, फक्त ‘इतक्या’ दिवसात निघणार उत्पादन!

सूर्यवंशी कुटुंबाने 10 लाख रुपये नाकारले, राज्य सरकारला मोठी चपराक

वाल्मिक कराडबद्दल आणखी एक धक्कादायक माहिती उघड, लाडकी बहीण योजनेच्या…

शेतकऱ्यांसाठीची महत्त्वाची योजना रखडली; या कारणामुळे योजनेचं भविष्य अधांतरी

आजचे राशिभविष्य! तुमच्या जीवनाचा मार्गदर्शक संदेश, नक्की वाचा

Join WhatsApp Group

Join Now