धक्कादायक! सदावर्ते गट आणि शिवसेना कार्यकर्ते भिडले; फ्री स्टाईल हाणामारी थेट पोलीस ठाण्यात!

On: October 15, 2025 5:21 PM
Gunratna Sadavarte
---Advertisement---

ST Bank Meeting Fight | एसटी बँकेच्या बैठकीत सदावर्ते गट (Gunratan Sadavarte) आणि शिवसेना शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ (Anandrao Adusul) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. बैठकीदरम्यान दोन्ही गटाचे कार्यकर्ते भिडले असून, चार ते पाच संचालक जखमी झाले आहेत. हा वाद नागपाडा पोलीस ठाण्यात पोहोचला असून दोन्ही गटांमध्ये तक्रारी दाखल झाल्या आहेत.

दिवाळी बोनसमुळे उठले वादाचे स्वरूप :

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी बँकेची मिटिंग बोलवण्यात आली होती. त्यात कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या दिवाळी बोनसवर चर्चा होत असताना सदावर्ते गट आणि अडसूळ गट यांच्यात मतभेद निर्माण झाले. या मतभेदामुळेच हाणामारी घडली. अडसूळ गटाचा आरोप आहे की, बैठकीमध्ये बाहेरून लोक आणले गेले आणि संचालकांसोबत बसवण्यात आले.

यावेळी माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adusul) म्हणाले, “या बँकेमध्ये सदावर्तेंनी (Gunratan Sadavarte) जो भ्रष्टाचार केला, त्यामुळे कर्मचाऱ्यांना बँक सुरक्षित वाटत नाही. 125 कर्मचाऱ्यांची भरती पैसे घेऊन झाली आहे आणि 12 कोटीच्या सॉफ्टवेअरसाठी 52 कोटी रुपये दिले गेले आहेत. ही सर्व माहिती सीसीटीव्ही फुटेजमध्ये आहे.”

ST Bank Meeting Fight | बँकेतील अनियमितता आणि ठेवींचा प्रश्न :

अडसूळ गटाचा असा आरोप आहे की, सदावर्तेंनी बाहेरची माणसे बैठकीत आणून राडा घातला. याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

एसटी को-ऑपरेटिव्ह बँक ही एसटी कर्मचाऱ्यांच्या घामाच्या पैशावर चालणारी आशियातील सर्वात मोठी को-ऑपरेटिव्ह बँक आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत बँकेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे बँकेतून ठेवी काढण्याची संख्या देखील वाढली असल्याची माहिती मिळते.

News Title: Fight Breaks Out at ST Bank Meeting Between Sadavarte and Adusul Groups; Directors Injured

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now