वनराज आंदेकरच्या मृत्यूनंतर वडिलांनी घेतली शपथ, म्हणाले ‘आता मी…’

On: September 5, 2024 6:31 PM
Pune News
---Advertisement---

Pune News | माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची रविवारी पुण्यातील नाना पेठेत हत्या झाली. रात्री नऊच्या सुमारास वनराज यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. या हत्याप्रकरणी पुणे पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

वनराज यांचे वडील बंडू आंदेकर यांनी या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वनराज यांच्या दोन बहिणी आणि दोन मेव्हण्याच्या सांगण्यावरून हे कृत्य करण्यात आल्याचं त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे.

दरम्यान आतापर्यंत या प्रकरणात दहा आरोपी निष्पन्न झालं असून, चौघांना अटक करण्यात आली आहे. यावर आता पहिल्यांदाच वनराज आंदेकर यांचे वडील आणि आंदेकर टोळीचे प्रमुख असलेल्या बंडू आंदेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लेकाच्या हत्येनंतर वडिलांनी घेतली शपथ

आंदेकर यांच्या हत्येनंतर टोळीयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे, यावर बोलताना बंडू आंदेकर यांनी म्हटलं आहे की, “मी शपथ घेऊन सांगतो असं काही करणार नाही.”

मी आता न्यायाची वाट बघेल. आम्ही गुन्हेगार होतो तर आम्हाला मारायचं होतं, निरपराध मुलाला का मारलं? असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला आहे.

Pune News | सख्ख्या दाजीने केला घात

वनराज यांचा खून त्यांच्या सख्ख्या दाजीने केला आहे. गणेश कोमकर आणि जयंत कोमकर यांच्यासह दोन सख्ख्या बहिणींना पोलिसांनी अटक केली आहे. वनराज यांच्या बहिणीचा आणि वनराज यांचा घरगुती वाद होता.आंदेकर यांनी कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिलं होतं, पण ते दुकान पुणे मनपाने अतिक्रमण कारवाईमध्ये पाडलं. त्याच रागातून सख्ख्या दाजीने वनराज आंदेकर यांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

इंदापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ, दत्तात्रय भरणेंच्या वक्तव्याने खळबळ

मोठी बातमी! जयदीप आपटेला ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

वयाच्या 40 व्या वर्षी ‘ही’ अभिनेत्री झाली आई

राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये; ठाकरे गटाला दिला मोठा धक्का

ठाकरेंच्या पक्षाकडून कोणाला तिकीट मिळणार? संभाव्य उमेदवारांची यादी

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now