शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! मोदी सरकारने दिले दिवाळी गिफ्ट

On: October 13, 2025 6:36 PM
Farmer Scheme
---Advertisement---

Farmer Scheme । केंद्र सरकारने दिवाळीआधी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. यावर्षी पर्यावरणाचा झालेला कहर आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याच्या भरपाईसाठी अजूनही सरकार काम करत आहे. अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावं लागत आहे. दरम्यान केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी काही नवीन योजना सुरु करणार आहे . (Central Goverment Farmer Scheme)

डाळ स्वावलंबन अभियान :

पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी शेतकऱ्यांसाठी ३५,४४० कोटींच्या दोन योजना सुरु केल्या आहेत. शनिवारी याविषयी माहिती दिली गेली होती. ‘डाळ स्वावलंबन अभियान’ आणि ‘पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना’ या दोन योजना सरकार सुरु करणार आहे. समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी यांनी कृषी, पशुपालन, मत्स्यपालन आणि अन्ना क्षेत्रांतील ५,४५० कोटींपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उत्घाटन केले. यातच त्यांनी शेतकऱ्यांसाठी या दोन योजना सुरु केल्या.

या योजनेचा उद्देश २०३०-३१ सालापर्यंत डाळींचे उत्पादन २५.२३८ पासून ३५ दशलक्ष टनांपर्यंत वाढवणे आहे. यासाठी सरकार ११,४४० कोटी रुपयांचा खर्च करणार असल्याचे देखील सांगितले आहे. याने देशाचे आयात अवलंबन कमी करणे सोपे होईल. (Central Goverment Farmer Scheme)

Farmer Scheme | पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना –

या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे. पीक उत्पादन, पीक घेण्यास शेतकऱ्यांना मदत करणे, सिंचन आणि पाणी साठवणूक क्षमता सुधारणे आणि शेतकऱ्यांसाठी सहज कर्ज उपलब्ध करून देणे या सर्व गोष्टींचा समावेश या योजनेत आहे. सरकार २४,००० कोटी रुपये खर्च करणार आहे. जवळपास १०० जिल्ह्यांचे या योजनेतून कायापालट होणार आहे.

दोन्ही योजनांना आधीच मित्रमंडळाची मंजुरी दिली गेली आहे. या योजनांचा कालावधी येत्या रब्बी हंगामापासून २०२३-३१ पर्यंत असणार आहे. दरम्यानच प्रधानमंत्रीने शेतकऱ्यांशी संवाद साधला

Title – Two New Scemes for Farmers by Modi Government  

Join WhatsApp Group

Join Now