“कदाचित उद्या माझा शेवटचा दिवस..”; आमिर खानच्या वक्तव्याने खळबळ

On: November 16, 2024 9:35 AM
Fans worried about aamir khan statement
---Advertisement---

Aamir Khan | ‘मिस्टर परफेक्टनिस्ट’ म्हणून बॉलीवूडचा अभिनेता आमिर खान प्रसिद्ध आहे. त्याचा चाहतावर्ग हा फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात दिसून येतो. बऱ्याच दिवसांपासून आमिरचा सिनेमा आलेला नाही. अशात त्याने दिलेली एक मुलाखत चर्चेत आली आहे. यात अभिनेत्याने केलेल्या एका वक्तव्यामुळे चाहते चिंतेत पडले आहेत. कदाचित उद्या माझा अखेरचा दिवस असेल… असं आमिर खान (Aamir Khan) म्हणाला आहे.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये आमिर खान म्हणाला की, “मी आतापर्यंत कधीच एकत्र सहा सिनेमे केले नाहीत. सिनेमा सोडण्याचा जेव्हा मी निर्णय घेतला तेव्हा मला एक विचार आला, काम करण्यासाठी माझ्याकडे आता फक्त 10 वर्ष शिल्लक आहेत.”

आमिर खानच्या वक्तव्याने चाहते चिंतेत

“आपण आपल्या आयुष्यावर विश्वास ठेऊ शकत नाही. कदाचित उद्या माझा अखेरचा दिवस असेल… माझ्याकडे आता फक्त 10 वर्षांचं आयुष्य शिल्लक आहे. मी आता 59 वर्षांचा आहे. पुढच्या दहा वर्षांत मी सत्तरी गाठेल. तेव्हा मी स्वस्थ राहील की नाही.. काम करू शकेल की नाही..त्यामुळे मी विचार केला आहे पूर्वीपेक्षा मला अधिक चांगलं काम करायचं आहे.”, असं आमिर खान (Aamir Khan)म्हणाला आहे.

माझं वय आता वाढत चाललं आहे. त्यामुळे मला मेहनती आणि टॅलेंटेड मुलांना संधी द्यायची आहे. वयाच्या 70 व्या वर्षी निवृत्त होण्यापूर्वी, मला प्रतिभावान लोकांसाठी एक व्यासपीठ तयार करायचं आहे, असंही आमिर मुलाखतीमध्ये म्हणाला. त्याचं हे विधान आता चर्चेत आलंय.

आमिर खानचा आगामी सिनेमा कोणता?

पुढे अभिनेत्याने आपल्या मुलांबद्दलही मोठं भाष्य केलं. मुलगा जुनैद आणि मुलगी आयरा खान नसती तर मी अभिनयाचा निरोप घेतला असता, असं आमिर म्हणाला. दरम्यान, अभिनेत्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तारे जमीन पर’ सिनेमाच्या सिक्वलमध्ये आमिर सध्या व्यस्त आहे.

या सिनेमाच्या सिक्वलचं नाव ‘सितारे जमीन पर’ असं आहे. सिनेमात अभिनेत्री जिनिलिया डिसूझा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे आमिर खानचे चाहते सध्या त्याच्या ‘सितारे जमीन पर’ या सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. आमिर 2022 साली ‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमात दिसला होता. आता तो (Aamir Khan) थेट ‘सितारे जमीन पर’ या सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

News Title :  Fans worried about aamir khan statement

महत्वाच्या बातम्या –

राज ठाकरेंना बालेकिल्ल्यातच धक्का, विश्वासू नेत्याचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश

रोहित शर्माच्या आयुष्यात ‘ज्युनिअर हिटमॅन’ची एंट्री; पत्नी रितिकाने दिला मुलाला जन्म

आज शनिदेवाच्या कृपेने ‘या’ राशींच्या मनोकामना पूर्ण होणार!

‘स्वाभिमानासाठी एकजुटीने….’; संभाजी पाटील निलंगेकरांचं मतदारांना आवाहन

…म्हणून भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला गुरूद्वाऱ्यातून बाहेर काढला!

Join WhatsApp Group

Join Now