अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; राजकीय वर्तुळात खळबळ

On: December 23, 2022 1:13 PM
---Advertisement---

नागपूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर अधिवेशन कालावधीत निलंबनाची कारवाई झाल्यामुळे विरोधक प्रचंड संतापले आहेत. यावर अजित पवारांनी (Ajit Pawar) देखील प्रतिक्रिया दिलीये.

सत्ताधाऱ्यांची सहा महिन्यांपासून मुजोरी सुरु आहे, असा आरोप अजित पवार यांनी आज केला. सत्ताधाऱ्यांच्या तक्रारी उचलून धरल्या जातात तर विरोधकांच्या दाबल्या जातात, असाही आरोप केला.

अजित पवारांनी यावेळी बोलताना मोठा गौप्यस्फोट केला. एकनाथ शिंदेंविरोधातला घोटाळ्याचा आरोप कुणी उघड केला हे अजित पवारांनी यावेली सांगितलं.

अजित पवारांच्या वक्तव्यामुळे आता एकनाथ शिंदे गट आणि भाजपमध्ये येत्या काळात मोठी ठिणगी पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जातेय.

दरम्यान, संजय राऊत यांनीही काल झालेल्या पत्रकार परिषदेत हा गौप्यस्फोट केला. दीड महिन्यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, आणि नागोराव गाणार या विदर्भातल्या आमदारांनीच या विषयावर तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. तोच विषय आम्ही घेतला, असं म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now