Hardik Pandya | टीम इंडियाचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे, मात्र यावेळी क्रिकेटमुळे नाही तर एका बॉलिवूड अभिनेत्रीशी जोडल्या गेलेल्या अफेअरमुळे. अलीकडेच अभिनेत्री ईशा गुप्ता हिने हार्दिकसोबतच्या नात्यावर मोकळेपणाने भाष्य करत स्पष्ट केलं की दोघांचं नातं ‘सुरु होण्याआधीच संपलं’.
हार्दिक पंड्या सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. नताशा स्टानकोविकसोबत घटस्फोटानंतर त्याचं नाव गायिका जैस्मिन वालियासोबत जोडलं जातं आहे. या दरम्यान अभिनेत्री ईशा गुप्ताने दिलेल्या एका मुलाखतीत हार्दिकसोबतच्या संबंधांबाबत अनेक खुलासे केले.
“नातं फक्त बोलण्यापुरतंच होतं” – ईशा गुप्ता :
ईशा गुप्ता हिने नुकतीच सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत हार्दिकसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर भाष्य करताना सांगितलं, “हो, आम्ही काही महिने बोललो होतो, पण आम्ही कधीही डेटिंग केलं नाही.” तिने स्पष्ट केलं की, “आमचं नातं त्या स्टेजपर्यंत पोहोचण्याआधीच संपलं.”
दोघे किती वेळा भेटले यावर तिने सांगितलं, “एकदा-दोनदा भेटलो होतो, पण आमचं नातं कधीच गंभीर झालं नाही.”
Hardik Pandya | “आम्ही परस्परांसाठी योग्य नव्हतो” :
ईशा गुप्ताने यावेळी हार्दिकबद्दल काहीही नकारात्मक बोललं नाही. ती म्हणाली, “हार्दिकमध्ये काही कमतरता नव्हती. पण आम्ही दोघे एकमेकांपासून खूप वेगळे होतो. मला फारशी लाइमलाइट आवडत नाही. साधं, घरातलं आयुष्य मला हवं असतं.”
ईशा गुप्ता ही तिच्या बोल्ड अंदाजामुळे आणि वेब सिरीज ‘आश्रम 3’ मधील दमदार भूमिकेमुळे चर्चेत राहिलेली अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिची चाहतावर्ग मोठा असून, तिच्या पोस्टसवर लाखो लाईक्स मिळतात. हार्दिकसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी तिच्या चाहत्यांमध्येही उत्सुकता निर्माण केली होती.






