EPFO Update | EPFO अंतर्गत आता कर्मचाऱ्यांना त्यांच्या PF अकाउंटमधून पूर्ण रक्कम काढता येणार आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला. याआधी PF मधून संपूर्ण रक्कम काढता येत नव्हती आणि पैसे काढण्यासाठी अनेक प्रश्न विचारले जात होते. (Employees’ Provident Fund Organisation)
नवीन नियमावली काय सांगते? :
PF मधून पैसे काढण्यासाठी आता तीन कारणांसाठी सुविधा मिळणार आहे: (PF withdrawal Policy)
शिक्षण
लग्न
आजारपण
या तीन विभागांतर्गत आपण PF अकाउंटमधून पैसे काढू शकता :
किती वेळा पैसे काढता येतील?
शिक्षणासाठी: 10 वेळा
लग्नासाठी: 5 वेळा
आजारपणासाठी: आवश्यकता नुसार
अर्ज केल्यास पैसे लगेच मंजूर होतील. काही ठराविक रक्कम काढायची असल्यास सेवा कालावधी 12 महिन्यांपर्यंत ठेवण्याची सुविधा आहे.
EPFO Update | PF खात्यात किती रक्कम ठेवणे आवश्यक आहे? :
किमान 25% शिल्लक खात्यात ठेवणे अनिवार्य आहे. निवृत्तीच्या वेळी ही रक्कम आणि त्यावर मिळणारे 8.25% व्याज व चक्रवाढ व्याज लाभ घेता येईल. (PF withdrawal Policy)
PF बॅलेन्स तपासण्यासाठी संबंधित मिस कॉल नंबर सेव्ह करून मिस कॉल देऊ शकता आणि बॅलेन्स लगेच मिळेल.






