EPFO Update | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या सदस्यांसाठी मोठी सुविधा आणण्याच्या तयारीत आहे. नोकरदार वर्गासाठी ही आनंदाची बातमी आहे कारण आता पीएफमधील रक्कम काढण्यासाठी दीर्घ प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज राहणार नाही. जानेवारी 2026 पासून एटीएमद्वारे पीएफमधील रक्कम काढण्याची सोय उपलब्ध होणार आहे. यामुळे कर्मचारी आपली बचत केलेली रक्कम कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगी सहज वापरू शकतील.
केंद्रीय श्रम मंत्रालयाने याबाबत बँका आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासोबत (RBI) चर्चा सुरू केली आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या बैठकीत या सुविधेला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. (EPFO New Rules)
पीएफ रक्कम एटीएममधून कशी काढता येणार? :
सध्या पीएफ रक्कम काढण्यासाठी यूएएन पोर्टलवर लॉगइन करून क्लेम फॉर्म भरावा लागतो. मात्र, नव्या बदलांनुसार ईपीएफओ (EPFO) सदस्यांसाठी विशेष कार्ड जारी करण्याचा विचार केला जात आहे. या कार्डच्या मदतीने कर्मचारी एटीएममधून आपल्या खात्यातील रकमेपैकी काही भाग काढू शकतील.
मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, ईपीएफओचे आयटी इन्फ्रास्ट्रक्चर आता अशा प्रकारच्या व्यवहारांसाठी पूर्णपणे तयार आहे. मात्र, एटीएमद्वारे किती रक्कम काढता येईल याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.
EPFO Update | मेंबर पासबुक लाईटसह नवे डिजिटल अपडेट्स :
ईपीएफओने अलीकडेच “पासबुक लाईट” सुविधा सुरु केली आहे. यामुळे सदस्यांना त्यांच्या खात्यात किती रक्कम शिल्लक आहे हे एका क्लिकवर पाहता येते. यापूर्वी स्वतंत्र वेबसाईटवर पासबुक तपासावे लागत होते. (EPFO New Rules)
तज्ज्ञांच्या मते, एटीएमद्वारे पीएफ पैसे काढण्याची सुविधा लागू झाल्यास कर्मचाऱ्यांना वेळेची बचत होईल. तसेच आपत्कालीन प्रसंगी शिक्षण, वैद्यकीय खर्च, लग्न किंवा घर बांधणीसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरेल.






