करोडो कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! PF संदर्भात अत्यंत महत्वाची माहिती समोर

On: January 9, 2026 3:04 PM
EPFO Update
---Advertisement---

EPFO News | नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ईपीएफओ सदस्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO कडून कर्मचारी वर्गासाठी एक महत्त्वाचा डिजिटल बदल करण्यात येत आहे. आतापर्यंत PF मधील रक्कम काढण्यासाठी ऑनलाईन क्लेम, पडताळणी आणि प्रतीक्षेची प्रक्रिया करावी लागत होती. मात्र आता ही संपूर्ण प्रक्रिया अधिक जलद आणि सोपी होणार आहे. EPFO कडून UPI आधारित सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे कर्मचाऱ्यांना तात्काळ PF रक्कम काढता येणार आहे. (PF Latest Update)

EPFO च्या या नव्या निर्णयामुळे देशातील सुमारे 30 कोटींहून अधिक सदस्यांना थेट फायदा होणार आहे. ATM सुविधा सुरू होण्याआधीच ही UPI सेवा लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत ही सुविधा कार्यान्वित होऊ शकते. विशेष म्हणजे, या सुविधेमुळे कर्मचारी गरज भासल्यास तात्काळ आगाऊ PF रक्कम काढू शकणार आहेत. EPFO च्या डिजिटल परिवर्तनातील हा एक मोठा टप्पा मानला जात आहे.

UPI द्वारे PF काढण्याची नवी प्रक्रिया :

या नव्या व्यवस्थेसाठी EPFO ने NPCI सोबत करार केला आहे. या करारानुसार BHIM UPI ॲपच्या माध्यमातून EPFO सदस्य आगाऊ PF रक्कम काढण्यासाठी दावा करू शकतील. आरोग्य, शिक्षण, लग्न किंवा इतर वैयक्तिक गरजांसाठी सदस्य थेट BHIM ॲपवरून अर्ज करू शकणार आहेत. अर्ज केल्यानंतर EPFO कडून संबंधित खात्याची पडताळणी करण्यात येईल. सर्व माहिती योग्य आढळल्यास तात्काळ क्लेम मंजूर केला जाईल. (PF Withdrawal UPI)

मंजुरीनंतर ही रक्कम थेट सदस्याच्या UPI शी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे. सुरुवातीला ही सुविधा फक्त BHIM UPI ॲपवर उपलब्ध असेल. मात्र पुढील टप्प्यात इतर UPI आधारित फिनटेक ॲप्सवरही ही सेवा सुरू केली जाण्याची शक्यता आहे. यामुळे PF काढण्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक होणार आहे.

EPFO News | रक्कम काढण्यावर मर्यादा आणि पुढील योजना :

या सुविधेसोबत काही मर्यादा देखील लागू असणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात संपूर्ण PF रक्कम काढण्याची परवानगी दिली जाणार नाही. RBI च्या UPI व्यवहार नियमांनुसार आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने एका ठराविक मर्यादेपर्यंतच रक्कम काढता येणार आहे. अधिकाऱ्यांच्या मते, एकाच वेळी पूर्ण रक्कम काढण्यास अनुमती दिल्यास गैरवापराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच मर्यादित रकमेची अट ठेवण्यात येणार आहे. (EPFO UPI Service)

दरम्यान, EPFO सदस्यांसाठी ATM आणि डेबिट कार्ड सुविधेचीही तयारी सुरू आहे. या डेबिट कार्डच्या मदतीने PF खाते थेट लिंक केले जाणार असून सदस्य कोणत्याही ATM मधून PF रक्कम काढू शकतील. सध्या मात्र UPI सेवा सुरू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. क्लेम अर्ज, दीर्घ प्रतीक्षा आणि कागदोपत्री अडथळ्यांपासून मुक्त होऊन PF रक्कम झटपट मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

News Title: EPFO Big Update: PF Withdrawal via UPI Soon, Major Relief for Employees

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now