EPFO | देशातील कोट्यवधी पगारदार कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) कडून मोठी खुशखबर आहे. लवकरच EPFO 3.0 ही नवी प्रणाली सुरू होणार असून यामध्ये पीएफ खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया आणखी सोपी होणार आहे.
एटीएम आणि यूपीआयद्वारे पैसे काढता येणार :
सध्या पीएफमधून पैसे काढण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर फॉर्म भरून काही दिवस वाट पाहावी लागते. मात्र, नव्या EPFO 3.0 व्यवस्थेत बँकेच्या एटीएममधून किंवा मोबाईलवरील यूपीआय ॲपद्वारे थेट 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम त्वरित काढता येईल. (EPFO PF News)
यामुळे आकस्मिक गरज पडल्यास कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण सध्या नोकरी बदलल्यास पीएफ ट्रान्सफरसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागतो. पण EPFO 3.0 लागू झाल्यावर ही ट्रान्सफर प्रक्रिया आपोआप होणार आहे. नवीन नोकरीला जॉईन होताच नियोक्त्याच्या खात्याशी जुने खाते लिंक होऊन रक्कम ट्रान्सफर होईल.
EPFO | अधिक सोयीस्कर वेबसाईट आणि ॲप :
EPFO च्या अधिकृत वेबसाईट आणि मोबाईल ॲपला अधिक यूजर-फ्रेंडली बनवले जाणार आहे.
शिल्लक रक्कम तपासणे
क्लेम स्टेटस तपासणे
पेन्शन सेवांचा वापर
हे सर्व काही रिअल-टाईम अपडेटसह आणखी सोपं होणार आहे.
दरम्यान, आधार लिंकिंग आणि KYC प्रक्रियेत अनेकदा अडचणी येतात. EPFO 3.0 मध्ये ही प्रक्रिया सोपी व जलद केली जाणार आहे. त्यामुळे सदस्यांना वारंवार होणाऱ्या तांत्रिक त्रासातून दिलासा मिळणार आहे.
कोणत्या कारणांसाठी पैसे काढता येतात? :
पीएफ खात्यातून ॲडव्हान्स म्हणून रक्कम काढण्यासाठी काही विशिष्ट कारणे मान्य आहेत :
घर किंवा जागा खरेदी
मुलांचे शिक्षण
लग्न
आजारपण
या नियमांनुसार पैसे काढण्यासाठी सध्या UAN पोर्टलवर लॉगिन करून फॉर्म भरावा लागतो. मात्र, नवी प्रणाली लागू झाल्यावर प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुलभ होईल.






