Entertainment News | भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण असून, ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला आहे की, जर त्यांनी दहशतवादाला पाठिंबा दिला, तर भारत पुन्हा लष्करी कारवाई करेल. या पार्श्वभूमीवर भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी टाकण्यात आली आहे. मात्र, अशा परिस्थितीत एका पाकिस्तानी अभिनेत्रीची चर्चा जोरात आहे – झेबा बख्तियार (Zeba Bakhtiar), जिने चार लग्न केले असून त्यातील दोन पती भारतीय आणि दोन पाकिस्तानी होते.
‘हीना’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये केलेलं पदार्पण-
झेबा बख्तियारने 1991 मध्ये दिवंगत अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्यासोबत ‘हीना’ (Heena) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. राज कपूर (Raj Kapoor) यांनी एका शोमध्ये झेबाला पाहिल्यानंतर तिला सिनेमासाठी कास्ट केलं. ‘हीना’ सिनेमात (Entertainment News) तिच्या भूमिकेचं प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केलं आणि त्या रातोरात स्टार बनल्या. मात्र, पुढे त्यांनी ‘जय विक्रांता’, ‘मोहब्बत की आरजू’, ‘सरगम’, ‘मुकदमा’ यांसारख्या चित्रपटांत काम केलं पण त्यांना यश मिळालं नाही. काही टीव्ही शोमध्येही त्या दिसल्या.
व्यक्तिगत आयुष्यात चार विवाह-
झेबा बख्तियारचं खऱ्या आयुष्यातील नाव शाहीन आहे. त्या पाकिस्तानातील माजी अटॉर्नी जनरल याह्या बख्तियार यांच्या कन्या आहेत. झेबा यांनी पहिलं लग्न सलमान वल्लियानी यांच्याशी केलं. दुसरं लग्न त्यांनी भारतीय अभिनेता जावेद जाफरी (Javed Jaffrey) यांच्याशी केलं. त्यानंतर झेबा यांनी गायक अदनान सामी (Adnan Sami) यांच्याशी तिसरं लग्न केलं.
या विवाहातून त्यांना (Entertainment News) अजान सामी खान (Azaan Sami Khan) हा मुलगा आहे, जो सध्या पाकिस्तानी मनोरंजन क्षेत्रात नावारूपाला आला आहे. झेबाच्या चौथ्या पतीचं नाव आहे सोहेल खान लेघारी. सध्या झेबा पाकिस्तानात वास्तव्यास असून, गेल्या अनेक वर्षांपासून त्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत.






