Entertainment News | मनोरंजनसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. वयाच्या 48 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याने अचानक जगाचा निरोप घेतलाय.
‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेता विकास सेठीचं (Vikas Sethi) निधन झालंय. हृदय विकाराच्या झटक्याने अभिनेत्याचं निधन झाल्याचं म्हटलं जात आहे.
प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन
अभिनेत्याच्या मागे आता त्याची पत्नी आणि दोन जुळी मुलं आहेत. सर्वजण कुटुंबाला स्टॉंग राहण्यास सांगत असून अभिनेत्याला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
कमी वयातच अभिनेत्याने जगाचा निरोप घेतल्याने कुटुंब, मित्र-परिवार आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. त्याने ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’, ‘कहीं तो होगा’, ‘कसौटी जिंदगी की’सह अनेक मालिकांमध्ये काम केलं होतं.
विकास सेठीने (Vikas Sethi) अनेक चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. ‘कभी खुशी कभी गम’, ‘दिवानापन’ मध्ये काम केलं होतं. बॉलीवूडच नाही तर तेलुगू हिट ‘आयस्मार्ट शंकर’मध्येही त्यानं महत्त्वाची भूमिका साकारली होती.
विकास सेठी कायम सोशल मीडियावर सक्रिय असायचा. अभिनेता कायम पत्नी आणि जुळ्या मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करायचा.
अभिनेत्याच्या अचानक जाण्याने दुःख व्यक्त केलं जात आहे. तो नच बलिए या डान्स रिॲलिटी शोमध्येही झळकला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
दीपिकाच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी!
“शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर जन्म कळणार नाही”
गणपती बाप्पाला ‘या’ राशीचे लोक फार प्रिय असतात!
आयफोन 16 ‘या’ देशात मिळणार सर्वात स्वस्त!
घरी गणपती बाप्पाची स्थापना करत असाल तर ‘या’ वस्तू घरात चुकूनही आणू नका!






