‘सेक्स लाईफमुळे बाॅलिवूडमध्ये…’; वकीलांनी दिलेल्या माहितीमुळे खळबळ

On: November 26, 2024 4:48 PM
entertainment news
---Advertisement---

Entertainment News | प्रसिद्ध संगीतकार ए आर रेहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानू यांच्या खासगी आयुष्यात एक संकट आलं आहे. कारण आता ए आर रेहमान आणि सायरा बानू यांनी एकमेकांसोबत घटस्फोट घेतला आहे. याबद्दल स्वतः ए आर रेहमान यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोटाची अधिकृत घोषणा देखील केली होती. त्यांच्या घटस्फोटानंतर बाॅलिवूडमध्ये चर्चांना उधाण आलं.

लग्नाच्या 30 वर्षानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ए र रेहमानच्या चाहत्यांना धक्का बसला. याआधी देखील सिनेसृष्टितील काही दिग्गज सेलिब्रेटिंचे घटस्फोट झाल्याचं समोर आलं, मात्र याच कारण वकीलांनी स्पष्ट केलं आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये ए र रेहमान यांची पत्नी सायराच्या वकिल वंदना शाह यांनी बॉलीवूडमध्ये (Entertainment News) लग्न का टिकत नाही हे सांगितलं आहे. या व्हिडीओमध्ये वंदनाने रेहमान आणि बानोच्या विभक्त होण्याबद्दल नव्हे तर सर्वसाधारणपणे बॉलीवूडमधील विवाहांबद्दल सांगितलं आहे. “द चिल अवर पॉडकास्ट” वर वंदना म्हणाली, बाॅलिवूडचं आयुष्य खूप वेगळं आहे. मला वाटत नाही की प्रतारणा हे लग्न तुटण्याचं कारण आहे.

काय कारण आहे?

वंदना म्हणाली की, घटस्फोट होण्यामागचे काही कारण आहेत त्यातील एक म्हणजे लैगिंक जीवन. मला असं वाटतं की त्यांचं लैंगिक जीवन खूप भिन्न आहे जे तेथे नाही. लैंगिक जीवनाच्या अपेक्षा सामान्य व्यक्तीच्या लग्नापेक्षा जास्त असतात. त्याचप्रमाणे व्यभिचार होतो आणि वन-नाइट स्टँडचा फारसा फरक देखील पडत नाही.

पुढे वंदना म्हणाली की, मी बाॅलिवूडचा भाग जरी नसले तरी, तरी देखील माझ्याकडे आलेल्या केसेसच्या आधारे मी हे सांगते. कंटाळवाणेपणा, पुरेसे महत्त्व न देणे किंवा लग्नाचा भाग नसलेल्या लोकांचं ऐकणं हे मुख्य मुद्दे आहेत. ज्यात आई, सपोर्ट करणारा भाऊ किंवा सासरे असू शकतात, असं त्यांनी सांगितलं. वंदना यांनी सामान्यतः बॉलीवूडच्या लग्नांबद्दल सांगितले असून रहमान आणि बानूबद्दल नाही.

News Title : entertainment news advocate talks about sexlife

महत्त्वाच्या बातम्या-

पराभव जिव्हारी लागला; ‘या’ बड्या नेत्याची राजकारणातून निवृत्तीची घोषणा

नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख ठरली! कधी होणार?

आधारकार्ड संदर्भात महत्वाची माहिती; नागरिकांना होणार फायदाच फायदा

“तो माझं तोंड बंद…”, लग्नाच्या पाच महिन्यानंतर पती जहीरबद्दल सोनाक्षीचा गौप्यस्फोट!

राजकारणात मोठा ट्विस्ट, भाजपकडून मास्टरप्लॅन, एकनाथ शिंदेंना मोठी जबाबदारी मिळणार?

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now