Entertainment News | पाकिस्तानी (Pakistani) मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण इंडस्ट्री हादरली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री हुमैरा असगर (Humaira Asghar) हिचा तिच्या कराचीतील (Karachi) घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. तिचा मृत्यू सुमारे दोन आठवड्यांपूर्वीच झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे. हुमैरा ‘तमाशा घर’ या रिॲलिटी शो आणि ‘जलाईबी’ (Jalaibee) या चित्रपटामुळे प्रसिद्ध होती.
दुर्गंधी येऊ लागल्याने पोलिसांना कळवले-
पोलिसांनी मंगळवारी, ८ जुलै रोजी या घटनेची (Entertainment News) माहिती दिली. शेजाऱ्यांना दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी कराचीतील इत्तेहाद कमर्शियल भागातील हुमैराच्या फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा तिचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळला. डीआयजी सय्यद असद रझा (DIG Syed Asad Raza) यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, मात्र तपास अजूनही सुरू आहे.
View this post on Instagram
या प्रकरणी, फॉरेन्सिक टीमला पाचारण करून पुरावे गोळा करण्यात आले आहेत आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. डॉक्टरांच्या मते, मृतदेह कुजण्याच्या जवळजवळ शेवटच्या टप्प्यात पोहोचला होता. ३२ वर्षीय हुमैरा गेल्या सात वर्षांपासून याच अपार्टमेंटमध्ये एकटी राहत होती. पोलिसांनी या प्रकरणी अफवा पसरवू नयेत आणि तपासाअंती सत्य समोर येईल, असे आवाहन केले आहे.
७१ हजारांहून अधिक फॉलोअर्स होते-
हुमैरा असगरच्या (Entertainment News) आकस्मिक आणि दुःखद निधनाने पाकिस्तानी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. हुमैरा सोशल मीडियावर खूप सक्रिय होती आणि तिच्या इन्स्टाग्रामवर ७१ हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. ती नियमितपणे तिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्याबद्दल आणि कामाबद्दल अपडेट्स देत असे.






