Entertainment News | आपल्या परखड वक्तव्यांमुळे आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री शर्लिन चोप्राने (Sherlyn Chopra) तिच्या व्यावसायिक आयुष्याच्या सुरुवातीच्या काळाबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. बॉलिवूडमध्ये (Bollywood) स्थिरावण्यासाठी संघर्ष करत असताना, आर्थिक अडचणींमुळे आपण अनेक पुरुषांसोबत पैशांसाठी शारीरिक संबंध ठेवले होते, अशी कबुली तिने एका मुलाखतीत दिली आहे.
पैशांसाठी शारीरिक संबंध-
शर्लिनने सांगितले की, करिअरच्या सुरुवातीला तिला अनेक वाईट परिस्थितींचा सामना करावा लागला. त्यावेळी पैशांची गरज भागवण्यासाठी तिने अनेक लोकांसोबत शारीरिक संबंध ठेवले. “मी हे काम फक्त आणि फक्त पैशांसाठी करत होती,” असे तिने स्पष्ट केले. हा खुलासा आपण सहानुभूती मिळवण्यासाठी किंवा स्वतःला वाईट ठरवण्यासाठी करत नसून, सत्य परिस्थिती लोकांसमोर मांडण्यासाठी करत असल्याचेही तिने नमूद केले.
आपल्याला आजही अशा कामांसाठी फोन आणि मेसेज येतात, असेही शर्लिन म्हणाली. “त्यांनी आता समजून घेतलं पाहिजे की मी असं काम पूर्वी करायची. पूर्वी केलेलं काम आता माझ्या लक्षात नाही,” अशा शब्दांत तिने आपण तो भूतकाळ मागे सोडून पुढे आलो असल्याचे स्पष्ट केले आहे.
अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी मिळवता आली नाही-
शर्लिन चोप्रा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि तोकड्या कपड्यांमुळे नेहमीच सोशल मीडियावर ट्रोल होत असते. तिने ‘कामसूत्र ३डी’ (Kamasutra 3D), ‘चमेली’ (Chameli) आणि ‘पौरुषपूर’ (Paurashpur) यांसारख्या काही चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम केले आहे. मात्र, तिला मुख्य प्रवाहातील अभिनेत्री म्हणून मोठी प्रसिद्धी मिळवता आली नाही.
सध्या शर्लिन अभिनयापासून दूर असली तरी, सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रिय असते. तिथे तिचा मोठा चाहतावर्ग असून, चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.






