Entertainment News | मलेशियात (Malaysia) जन्मलेल्या भारतीय वंशाच्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि टीव्ही होस्ट लिशालिनी कनारनने (Lishalini Kanaran) एका पुजाऱ्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने मंदिरातच पुजाऱ्याने आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचे तिने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे सांगितले आहे. या घटनेनंतर मलेशियन पोलिसांनी (Malaysian Police) तपास सुरू केला असून, आरोपी पुजाऱ्याचा शोध घेतला जात आहे.
नक्की काय घडलं?
लिशालिनीने तिच्या पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ही घटना (Entertainment News) गेल्या शनिवारी मलेशियातील सेपांग (Sepang) येथील मरिअम्मन मंदिरात (Mariamman Temple) घडली. तिची आई भारतात असल्याने ती मंदिरात दर्शनासाठी एकटीच गेली होती. पूजेनंतर, तेथील पुजाऱ्याने तिला ‘खास आशीर्वाद’ देण्याचे सांगून आपल्या खासगी ऑफिसमध्ये बोलावले.
ऑफिसमध्ये गेल्यानंतर पुजाऱ्याने एका तीव्र वासाचे द्रव पाण्यात मिसळून ते ‘पवित्र जल’ असल्याचे सांगितले. त्याने ते पाणी तिच्या चेहऱ्यावर इतके शिंपडले की, तिच्या डोळ्यांची जळजळ होऊ (Entertainment News) लागली आणि तिला डोळे उघडणेही कठीण झाले. याच संधीचा फायदा घेत, पुजाऱ्याने कोणताही इशारा न देता आपले हात तिच्या ब्लाउज आणि ब्राच्या आत घालून तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, असा धक्कादायक आरोप लिशालिनीने केला आहे.
पुजाऱ्याने माझ्यावर लैंगिक अत्याचार केला –
“विश्वासाचा असा घात झाल्याने मनाला खोल जखम होते. मी अधिक तपशील देऊ शकत नाही, पण त्या पुजाऱ्याने माझ्यावर लैंगिक अत्याचार केला आणि मी काहीच करू शकले नाही,” अशा शब्दांत तिने आपली व्यथा मांडली आहे. तिच्या या खुलाश्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून, अनेकजण मंदिर प्रशासनावर आणि आरोपी पुजाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी करत आहेत.






