मुंबईच्या फ्लॅटवर काय काय घडलं?; सिद्धांत शिरसाटचा धक्कादायक कारनामा

On: May 28, 2025 10:12 AM
Siddhant Shirsat
---Advertisement---

Siddhant Shirsat | राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत संजय शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. संबंधित महिलेच्या दाव्यानुसार, सिद्धांतने तिला भावनात्मक ब्लॅकमेल करून लग्नासाठी भाग पाडले, ज्यामुळे तिच्या आयुष्यात मोठी उलथापालथ झाली.

सिद्धांत शिरसाटचा धक्कादायक कारनामा

संबंधित महिलेच्या म्हणण्यानुसार, 2018 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सिद्धांत शिरसाट यांच्यासोबत तिची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि चेंबूर येथील एका फ्लॅटवर त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. याच फ्लॅटवर त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. यानंतर सिद्धांतने महिलेमागे लग्नासाठी तगादा लावला.

ही महिला आधीच विवाहित असल्याने, सिद्धांतने तिला भावनात्मक ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्याने ‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी आत्महत्या करेन,’ असा धोशा लावला. सिद्धांतच्या या भावनिक आवाहनावर विश्वास ठेवून आणि त्याच्या आत्महत्येच्या धमकीमुळे या महिलेने अखेर त्याच्याशी लग्न केले, असा दावा संबंधित महिलेने केला आहे.

या गंभीर आरोपांमुळे सिद्धांत शिरसाट यांच्यावर नैतिक आणि कायदेशीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका विवाहित महिलेला तिच्या पतीपासून वेगळे करून स्वतःशी लग्न करण्यास भाग पाडणे आणि त्यासाठी आत्महत्येसारख्या टोकाची धमकी देणे, हे अत्यंत गंभीर गुन्हेगारी कृत्य मानले जात आहे.

Siddhant Shirsat | ब्लॅकमेलिंग करून लग्नासाठी जबरदस्ती

या घटनेमुळे समाजातील भावनिक ब्लॅकमेलिंगच्या धोक्यावर आणि त्याचा व्यक्तीच्या आयुष्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य बाहेर आणावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

News Title- Emotional Blackmail for Marriage

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now