‘सलमान खानला लोकं घाबरतात!’, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा थेट गौप्यस्फोट

On: October 13, 2025 1:32 PM
Salman Khan
---Advertisement---

Salman Khan | बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अभिनेता सलमान खान गेली अनेक वर्षे चित्रपटसृष्टीवर राज्य करत आहे. त्याचं नाव म्हणजेच चर्चेचा विषय! नुकताच एका प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमान खानविषयी केलेलं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. अभिनेत्रीने म्हटलंय की, “सलमान खानमुळे माझ्यासोबत इंडस्ट्रीमध्ये कधीच गैरवर्तन झालं नाही.” (Elli AvrRam interview)

या अभिनेत्रीचं नाव आहे एली अवराम (Elli AvrRam). एका खास मुलाखतीदरम्यान तिने सलमान खानसोबतच्या नात्याबद्दल, त्याच्या स्वभावाबद्दल आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या तिच्या अनुभवांबद्दल खुलेपणाने मत व्यक्त केलं. (Elli Avram Salman Khan Statement)

“सलमानसोबत असलात की लोकं घाबरतात” — एली अवराम :

एली म्हणाली, “मी सलमान खानच्या संपर्कात आहे. त्याच्यासोबत राहणाऱ्या लोकांना इंडस्ट्रीत कोणी त्रास देत नाही. खरं सांगायचं तर, सलमानमुळे माझ्यासोबत कधीच कोणी गैरवर्तन केलं नाही.”

तिने पुढे सांगितले, “सलमान खान आपल्या ओळखीतील लोकांना नेहमी लक्षात ठेवतो. तो कोणालाही सहज विसरत नाही. अगदी अनेक वर्षांनी आम्ही गणपतीत भेटलो, तरी त्याने मला ओळखलं आणि संवाद साधला.” या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी सलमान खानच्या स्वभावाचं पुन्हा एकदा कौतुक केलं आहे. (Elli Avram Salman Khan Statement)

Salman Khan | “सलमान माझ्या आयुष्यात देवदूतासारखा आला” :

एली अवराम पुढे म्हणाली, “सलमान आपल्या माणसांची योग्य काळजी घेतो. तो खूप मदत करणारा आणि संवेदनशील आहे. माझ्या आयुष्यात तो एका देवदूतासारखा आला.”

ती पुढे म्हणाली, “मुलींना इंडस्ट्रीत अनेक वेळा वाईट अनुभव येतात. पण लोकं सलमान खानला घाबरतात, त्यामुळे कोणी गैरवर्तन करण्याचं धाडस करत नाही. हे त्याचं लोकांना वागवण्याचं चांगलं तंत्र आहे आणि त्यासाठी मी कायम आभारी आहे.”

एली अवरामचा प्रवास आणि अनुभव :

एली अवराम (Elli AvrRam) सध्या बॉलिवूडमधील सक्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती ‘मिकी व्हायरस’, ‘मलंग’ आणि ‘गुडबाय’सारख्या चित्रपटांमध्ये झळकली आहे. बॉलिवूडमध्ये स्थिर होण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला.

“मी माझ्या जगात राहते. माझ्यावर आणि माझ्या करिअरवर मी प्रचंड काम करते. मी कधीच कोणाकडून मदत मागत नाही, अगदी वडिलांकडूनही नाही,” असंही ती म्हणाली.

News Title: Elli AvrRam’s Shocking Revelation: “People Fear Salman Khan; No One Dared Misbehave with Me Because of Him”

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now