संतोष देशमुखांच्या हत्येविरोधात विरोधक प्रचंड आक्रमक! घेतला सर्वात मोठा निर्णय

On: December 25, 2024 12:59 PM
Santosh Deshmukh Case
---Advertisement---

Santosh Deshmukh Case l बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. मात्र या खूनाला अनेक दिवस उलटूनही मुख्य आरोपी अद्यापही मोकाटच आहेत. त्यामुळे विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहेत. अशातच आता या घटनेमुळे विरोधक शनिवारी मोर्चा काढणार आहेत.

अजितदादांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी विरोधक मोर्चा काढणार आहेत. तसेच या मोर्चामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार देखील सहभागी होणार असल्याची माहिती खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. पत्रकार परिषदेदरम्यान खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

यावेळी खासदार सोनावणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील खोचक टोला लगावला आहे. “तर अजितदादांनी या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं” असं ते म्हणाले आहेत. तसेच पालकमंत्री कोणीही व्हावं, तसेच कोणालाही करावं. पण सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला लवकरात लवकर अटक करा अशी मागणी खासदार सोनावणे यांनी केली आहे.

Santosh Deshmukh Case l सरपंच हत्याप्रकरणावरून विरोधक आक्रमक :

संतोष देशमुख हत्याप्रकरणी पोलीसांच्या निष्क्रियतेवर आणि आरोपींना पाठीशी घालण्याच्या प्रकाराविरोधात विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहेत. मात्र अशातच आता विरोधक शनिवारी बीडमध्ये मोर्चा काढणार आहेत. या मोर्चामध्ये शरद पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक दिग्गज नेते सहभागी होणार असल्याची माहिती बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली आहे.

दरम्यान खासदार बजरंग सोनावणे म्हणाले की, 28 डिसेंबरच्या मोर्चात अंजली दमानिया सहभागी होणार की नाही हे मात्र मला माहीत नाही. परंतु, मी मात्र या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. तसेच खासदार म्हणून माझी जबाबदारी देखील आहे. त्यामुळे मी सहभागी होणार आहे असे ते म्हणाले आहेत.

News Title – Elgar of the opposition against the killing of Santosh Deshmukh

महत्त्वाच्या बातम्या-

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण योजनेची केली घोषणा

“संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं”; नवीन खुलासा समोर

“1500 रुपये देण्यासाठी बहीणींच्या नवरे व भावांना बेवडे बनवणार”; ‘या’ नेत्याचा हल्लाबोल

लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार का? आदिती तटकरेंनी दिलं उत्तर

“20-22 वर्षांची पोरं हवेत गोळीबार करतात, ‘गँग्स ऑफ बीड’चे धनी कोण?”

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now