‘बटेंगे तो कटेंगे’वर होणार कारवाई?

On: November 22, 2024 10:58 AM
Municipal Elections Reservation
---Advertisement---

Maharashtra l राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालाची चाहूल लागली आहे. या विधानसभेला महाविकासआघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळणार आहे. मात्र आता मतदानानंतर विविध संस्थांनी एक्झिट पोल देखील समोर आले आहेत. तर निवडणूक आयोग आता राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचारासाठी वापरण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांवर कारवाई करणार आहे.

वादग्रस्त विधानांची चौकशी होणार? :

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचारातील वादग्रस्त विधान निवडणूक आयोगाच्या रडारवर आले आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांनी यासंदर्भात एक अहवाल देखील मागवला आहे.

यामध्ये महाराष्ट्रातील निवडणुकांच्या प्रचारादरम्यान वापरण्यात आलेले वादग्रस्त विधानांचा अहवालांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता बटँगे तो कटेंगे तसेच एखाद्याला धमकी देणे व सामाजिक किंवा धार्मिक भावना भडकवणाऱ्या विधानांचा देखील अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाने मागवला आहे.

Maharashtra l 15 दिवसात हा अहवाल द्यावा लागणार :

मात्र आता येत्या 15 दिवसात हा अहवाल द्यावा अशा सूचना राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून आतापर्यंत तब्बल 15 अहवाल पाठवण्यात आले आहेत अशी माहिती मिळाली आहे. तर आता यावर निवडणूक आयोग नेमकी काय कारवाई करणार याची राजकीय वर्तुळात देखील उत्सुकता पाहायला मिळत आहे.

या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात महायुतीला तब्बल 129 ते 139 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर राज्यात महाविकासआघाडीला 136-145 जागा मिळू शकतात असा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे. याशिवाय इतर आणि अपक्ष उमेदवारांना 13 ते 23 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवला आहे.

News Title – Election Commission will take action against controversial statements

महत्त्वाच्या बातम्या-

अजित पवार ‘या’ तारखेला CM पदाची शपथ घेणार; बड्या नेत्याचा दावा

सोन्याचा दरवाढीला कौल, दोनच दिवसांत झाली ‘इतक्या’ हजारांची वाढ; पाहा आजच्या किंमती

महाविकास आघाडीला बहुमत मिळणार?, आणखी एका एक्झिट पोलचा निकाल समोर

देवी लक्ष्मी ‘या’ राशीची झोळी सुख व पैशांनी भरवणार?, वाचा राशीभविष्य

महायुती सरकार घासून नाही तर ठासून येणार, ‘या’ नेत्याला विश्वास

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now