Eknath Shinde | मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी शिंदे यांनी ‘ठाणे पॅटर्न’ (Thane Pattern) मुंबईत राबवण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ते मायक्रो मॅनेजमेंटवर विशेष भर देत आहेत.
‘ठाणे पॅटर्न’ मुंबईत राबवणार
ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) हा शिवसेनेचा विशेषता एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र हा बालेकिल्ला एवढी वर्ष कसा राखून ठेवला याचं गणित एकनाथ शिंदेंनी पदाधिकारी मेळाव्यात उलघडून सांगितलं. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) ठाण्यात विविध समाज, जात किंवा व्यवसायनिहाय सेल उभे केले आहेत. प्रत्येक सेलमध्ये त्या समाजाचा प्रतिनिधी ठेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात आले. त्यामुळे समाजघटक एकवटले आणि बहुभाषिकांची मोट बांधत शिंदेंनी ठाण्यात आपला बालेकिल्ला मजबूत केला. आता हाच पॅटर्न ते मुंबईत लागू करणार आहेत.
कशी असणार रणनीती
शिवसेनेशी संलग्न असलेली स्थानिक लोकाधिकार समिती महासंघ पुन्हा अॅक्टीव केली जाणार मुंबईत तब्बल 25 ते 30 समाज-व्यवसायनिहाय सेल स्थापन करणार. स्थानिक प्रश्न थेट सोडवून नागरिकांशी संपर्क वाढवणे. विमा संघटना, तेल कंपन्या, विमान वाहतूक, रेल्वे, परिवहन, व्यापारी, वकील आणि वारकरी संघटनांना जोडणे. शिवसेनेशी संलग्न स्थानिक लोकाधिकार समिती महासंघ पुन्हा सक्रिय करणे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने एकमेकांविरोधात निवडणूक लढल्या. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना 9 जागा मिळाल्या तर शिंदेंना 7 जागा मिळाल्या. पण विधानसभेत शिंदेनी कंबर कसली आणि शिंदेच्या शिवसेनेचे तब्बल 57 आमदार निवडून आले तसेच राज्यात सरकारही आहे. तर उद्धव ठाकरेंना फक्त 15 जागा मिळाल्या.
राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लागणार आहेत. या निवडणुकीत राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा आहे. येणाऱ्या निवडणूक दोन्ही ठाकरे बांधून राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी महत्वाच्या आहेत. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूनी कंबर कसली आहे. ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपही (BJP) उत्सूक आहे. तर शिंदेंनीही मुंबई शिवसेनेचा बालेकिल्ला आहे असे म्हणत तयारी सुरु केली आहे.
मुंबईतील सध्याची परिस्थिती
शिवसेना फुटीनंतरची परिस्थिती :-
2017 मध्ये शिवसेनेचे विजयी नगरसेवक – 84
अपक्ष व मनसे नगरसेवकांचा प्रवेश होऊन एकूण – 97
शिवसेना फुटीनंतर :
उद्धव ठाकरे गट – 55 नगरसेवक
एकनाथ शिंदे गट – 44 नगरसेवक
शिंदे यांनी पदाधिकारी बैठका, मेळावे घेत नेत्यांना जबाबदाऱ्या दिल्या आहेत. मुंबई हा आपला गड असल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात असला तरी, शिंदे यांनी आता ठाण्यातील पॅटर्न मुंबईत राबवत हा गड जिंकण्याची जोरदार तयारी केली आहे.
News Title :- Eknath Shinde’s special strategy to win the Mumbai Municipal Corporation; Know the details






