राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा

On: October 3, 2025 11:45 AM
Eknath Shinde
---Advertisement---

Eknath Shinde | मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा (Eknath Shinde dasara melava) पार पडला. यावेळी झालेल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांच्या डोक्यावरील आर्थिक भार कमी होणार आहे. यामुळे आता मराठवाडा, विदर्भातील हजारो शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. (Maharashtra Rain)

एकनाथ शिंदे यांची घोषणा :

एकनाथ शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाल आहे. आम्ही सरकार म्हणून शेतकऱ्यांची पूर्ण ताकदीने मदत करणार आहोत. अतिवृष्टीग्रस्त कुटुंबात ज्या मुला-मुलींची लग्न ठरलेली असतील ती लग्न आम्ही शिवसेना पक्षातर्फे लावून देऊ, असे शिंदे यांनी भाषणात जाहीर केले आहे. (Farmer Help)

ही घोषणा करताना “मराठवाड्यात, विदर्भात अतिवृष्टीचं मोठं संकट आलं. अनेकांच्या आयुष्यात संकट आले आहे. यात अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. नुकसानग्रस्त कुटुंबातील ज्या मुला-मुलींची लग्नं ठरली असतील त्या सर्वांची लग्न लावून देण्याची जबाबदारी शिवसेना घेत आहे,” अशी घोषणा शिंदे यांनी केली. यावेळी त्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा, अशा सूचना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दिल्या. (Eknath Shinde dasara melava)

Eknath Shinde | बाळासाहेब ठाकरेंचे जन्मशताब्दी वर्ष… :

तसेच, पुढचं २०२६ हे बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष असून हे जन्मशताब्दी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे केले जाईल, असेही शिंदे यांनी जाहीर केले. उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची एक बैठक आहे. या बैठकीत आम्ही निर्णय घेऊ, असेही शिंदे आपल्या भाषणात म्हणाले. पण जिथे-जिथे मदत करता येईल, तिथे शिवसैनिकांनी मदत करावी. बळीराजाचे अश्रू पुसण्याचे काम आपण करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. (Maharashtra Election) याबद्दलही यावेळी त्यांनी भाष्य केले. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, आपापसातले सगळे मतभेद विसरून जा आणि आता कामाला लागा अशा सूचना दिल्या. ते म्हणाले, आता एकच लक्ष समोर असले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा डौलाने फडकावयचा आहे. आपल्याला निवडणुका नवीन नाहीत, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीचे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Eknath Shinde dasara melava)

News title : Eknath Shinde’s biggest announcement for the farmers of the state

Join WhatsApp Group

Join Now