राजकारणात मोठा ट्विस्ट, भाजपकडून मास्टरप्लॅन, एकनाथ शिंदेंना मोठी जबाबदारी मिळणार?

On: November 26, 2024 2:31 PM
Maharashtra
---Advertisement---

मुंबई | महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न अजूनही कायम आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेंस कायम आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच मुख्यमंत्री बनवावं म्हणून शिवसेनेच्या नेत्यांची मागणी आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असं भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आल्यामुळे शिंदे यांना नाराज करता येणार नाही, अशी भूमिकाही भाजपच्या एका गोटातून मांडली जात आहे.

राजकारणात मोठा ट्विस्ट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या लोकप्रियतेमुळेच महाराष्ट्रात महायुतीला सर्वात मोठा विजय मिळाला आहे. अपेक्षेपेक्षाही मोठे यश महायुतीला मिळाले. या यशाचे खंदे शिल्पकार असलेले एकनाथ शिंदे यांना नाराज करू नये, अशी भूमिका भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी मांडली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास एकनाथ शिंदेंचं काय?, असा प्रश्न अनेकांना पडलाय. अशात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलंय.

भाजपने मुख्यमंत्री कोण होणार हे निश्चित केलं आहे. आमच्या जागा जास्त आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार, असा संदेश भाजपकडून एकनाथ शिंदेना देण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत आलं पाहिजे. त्यांनी दिल्लीत योगदान दिलं पाहिजे, असं रामदास आठवले यांनी म्हटलंय.

Eknath Shinde नाराज?

एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस मुख्यालयातील शहीद स्मारकाला भेट दिली. यावेळी त्यांच्यातील टेन्शन देहबोलीतून जाणवत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. राजकीय वर्तुळात याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

फडणवीसांना मुख्यमंत्री करणं भाजपला पडणार भारी?, ‘या’ 3 गोष्टींनी चिंता वाढवली

… त्या गोष्टीसाठी भाजप शिंदे व अजित पवारांचा पक्ष फोडेल!

दिल्लीतून ‘तो’ निरोप आला अन् इकडे एकनाथ शिंदे रूसल्याच्या चर्चेला उधाण

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दिला राजीनामा

सरकारकडून Pan Card संबंधी मोठा बदल; जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार, कारण..

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now