एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला का?

On: November 27, 2024 5:50 PM
Eknath Shinde
---Advertisement---

Eknath Shinde l विधानसभेत महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्याने राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे. मात्र मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. परंतु, एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळावे यासाठी दबावतंत्राचा वापर सुरु असल्याचे देखील बोलले गेले आहे. अशातच आज एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले? :

पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे म्हणाले की, मी मनमोकळा माणूस आहे. मी काहीही ताणून ठेवलेले नाही. त्यामुळे मी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना देखील फोन केला होता. तसेच सरकार बनविताना माझ्यामुळे अडचण आहे, असे तुमच्या मनात देखील आणू नका. तसेच तुम्ही आम्हाला खूप जास्त सहकार्य केले आहे, त्यामुळे तुम्ही निर्णय घेऊ शकता.

तुमचा निर्णय आम्हाला मान्य असेल, असे मोदी-शाहांना सांगितल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच गुरूवारी नवी दिल्लीत मुख्यमंत्रिपदासंदर्भात आणि मंत्रिमंडळाच्या चर्चेसाठी बैठक होईल, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Eknath Shinde l मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला का? :

याशिवाय भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना निर्णय घेण्याचे सर्व अधिकार असतील असे तुम्ही सांगितल्याने मुख्यमंत्रिपदावरील दावा आपण सोडला असे म्हणायचे का? त्यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मी वारंवार तुम्हाला सांगतोय, मोदी शाह यांनी गेली अडीच वर्ष आम्हाला सहकार्य केले आहे.

याशिवाय सर्वसामान्य शिवसैनिकाला त्यांनी मुख्यमंत्री बनवले आहे. आता देखील त्यांचा निर्णय अंतिम असून शेवटपर्यंत त्यांनी दावा सोडल्याचे देखील जाहीर केले नाही.

News Title : eknath shinde statement on cm

महत्त्वाच्या बातम्या-

“लोकप्रियता मिळवण्यासाठी मी…”; पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

‘मी मोदी आणि शाह यांना फोनवर सांगितलं…’; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे शिंदेंना मान्य, जाता जाता म्हणाले…

महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी, कोणाला मिळणार डच्चू?

श्रीकांत शिंदे होणार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री?; ‘या’ बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने खळबळ

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now