Eknath Shinde | विधानसभा निवडणुकीचं बिगूल आता येत्या काही दिवसात वाजणार आहे. त्यामुळे राज्यात राजकीय पक्षाचे नेते तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजेनेची जनसन्मान यात्रा सुरु आहे. मात्र, विरोधकांनी या योजनेवर टिका केली. एवढंच नाही तर, ही योजना बंद व्हावी यासाठी कोर्टात देखील धाव घेतली. दरम्यान, या योजनेबदल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आलं. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी एक नवा खुलासा केला आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
एका मुलाखतीत बोलत असताना शिंदेंनी (Eknath Shinde) लाडकी बहिण योजनेवर भाष्य केलं. ते म्हणाले की, “आम्ही लेक लाडकी लखपती योजना सुरु केली. ही योजना आम्ही अगोदरच केली होती. यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरु केली”. या योजनेचा 2 कोटी महिलांनी फाॅर्म भरला. शिवाय या महिलांनच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा झाले.
दिल्लीत आम्ही पैसे आणायला जातो-
पुढे बोलत असताना शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, “मला लोक कायम विचारतात की तुम्ही दिल्लीत जातात. तर दिल्लीत आम्ही पैसे आणायला जातो, विकासासाठी जातो, आणि याचा आम्हाला अभिमान आहे”. त्यामुळेच आज पुणे आणि ठाणे या सारख्या शहरात मेट्रोला मंजूरी मिळाली. या सगळ्या गोष्टी आम्ही का करतो, तर महाराष्ट्राला मिळवण्यासाठी, स्वतःला मिळण्यासाठी नाही.
तरुणांसाठी योजना-
तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आणली. असं करणारं हे पहिलं राज्य आहे. आता 10 लाखांपैकी दीड लाख तरुणांनी अर्ज भरले आहेत. लाडक्या बहीणीच्या बातम्याखाली ते थोडं दबून गेलं आहे. आम्ही वयश्री योजना सुरु केली. ज्येष्ठांना महिन्याला 3 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला.
News Title : Eknath Shinde reveals about delhi
महत्त्वाच्या बातम्या-
‘किती वेळा नवरे बदलले तू…’; एकनाथ खडसे संतापले
कॅन्सरने त्रस्त असलेल्या हिना खानला झाला आता ‘हा’ आजार!
गौतमी पाटीलसोबत घडला भयानक प्रकार!
…XYZ माणसाबद्दल मी काही बोलत नाही; पंकजा मुंडे असं कोणत्या नेत्याला म्हणाल्या
वस्तादने एक डाव राखून ठेवलाय; बापासोबत कायम राहा…; अजितदादांचा सल्ला






