एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला लगावला!

On: December 21, 2024 8:41 PM
Election Results 2026
---Advertisement---

Eknath Shinde l राज्यात विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडलं आहे. या अधिवेशनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. आता या भेटीवर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका :

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे देखील म्हटले होते. मात्र आता ते आमदारकी वाचवण्यासाठी अधिवेशनात पर्यटक म्हणून येऊन गेले असा अप्रत्यक्ष टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

तसेच अधिवेशनात 17 विधेयके मंजूर झाली आहेत. यामध्ये पुणे विमानतळाला संत एकनाथ महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव देखील संमत करण्यात आला आहे. परंतु, आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे देखील पाठवला जाणार आहे. याशिवाय अधिवेशाच्या काळात मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. तसेच विधान परिषदेच्या सभापतींची निवड देखील झाली. त्यामुळे विरोधकांनी सभागृहात प्रश्न उपस्थित न करता पायऱ्यांवर व माध्यमांवर प्रश्न मांडले असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Eknath Shinde l उपमुख्यमंत्री अजित पवार कुठे गेले? :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपूर मेट्रोसाठी कर्ज मिळाले आहे. मात्र हे कर्ज एक टक्के कमीपेक्षा व्याजदराने जापान सरकारकडून घेण्यात येणार आहे. मात्र ते आता डॉलर ऐवजी येनमध्ये पैसे मिळणार आहे. तसेच हे कर्ज तब्बल 3 हजार 584 कोटी कर्ज असणार आहे.

त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे माझी परवानगी घेऊन बीड आणि परभणीत सरकारमार्फत गेले आहेत. तसेच आता लवकरच मंत्रिमंडळाचे खातेवाटप होणार असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

News Title –Eknath Shinde On Uddhav thackeray

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now