ठाकरे-फडणवीसांच्या भेटीवर एकनाथ शिंदेंची शेलक्या शब्दांत टीका!

On: December 18, 2024 2:10 PM
Election Results 2026
---Advertisement---

Eknath Shinde l राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा सर्वात मोठा विजय झाला आहे. यानंतर तब्बल दोन आठवड्यांनी महायुतीने राज्यात सत्ता देखील स्थापन केली आहे. अशातच सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. मात्र या अधिवेशनादरम्यान काल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेलक्या शब्दांत टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंमध्ये बदल झाले :

दरम्यान, काल 17 डिसेंबरला उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या विधीमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची देखील भेट घेतली. मात्र आता या भेटीवरून राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

परंतु, आज शिवसेना ठाकरे पक्षाकडून कालची भेट ही सदिच्छा भेट असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र आता या भेटीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रोखठोख भाष्य केलं आहे. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंमध्ये बदल झालेला दिसत आहेत” असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Eknath Shinde l एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले? :

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “खूप चांगली गोष्ट आहे की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. मात्र आता सगळे विरोधक सत्ताधाऱ्यांना भेटतात. मुख्यमंत्री देखील प्रत्येकाला भेट देत असतात. हे चित्र पाहिलं की काही दिवसांपूर्वी टोकाची टीका करणारे, तसेच देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याची भाषा करणारे, तसेच सत्ता आल्यावर तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे, सरकार आल्यावर तुम्हाला तुरुंगात टाकू असं देखील म्हणणारे 2019-20 मध्ये त्यांचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस आणि माझ्याविरोधात कटकारस्थान करणारे, याशिवाय कारस्थान रचून आम्हाला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करणारे आता काय करतायत ते बघा”. अशी टीका एकनाथ शिंदेनी ठाकरेंवर केली आहे.

News Title – Eknath Shinde on Uddhav Thackeray 

महत्त्वाच्या बातम्या-

भुजबळांच्या नाराजीवर अजितदादा मोठा निर्णय घेणार?

SBI बँकेत बंपर भरती; शैक्षणिक पात्रता ते पगार, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

महायुतीने घेतला ‘या’ मोठ्या पदाचा निर्णय!

लालकृष्ण आडवाणी यांच्यावर ICU त उपचार सुरू, हेल्थबद्दल मोठी अपडेट समोर

कोट्यवधी PF खातेदारांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now