Eknath Shinde | लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी (Rahul gandhi) पुन्हा एकदा मतचोरीचे गंभीर आरोप करत भाजप आणि निवडणूक आयोगावर (Election Commission) थेट निशाणा साधला. कर्नाटकमधील निवडणुकीदरम्यान अनेक मतदारांची नावे जाणीवपूर्वक वगळण्यात आली असल्याचा त्यांनी दावा केला. एवढंच नाही तर त्यांनी या संदर्भातील काही व्हिडिओ पुरावे पत्रकार परिषदेत सादर केले. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
एकनाथ शिंदे यांचे आव्हान :
राहुल गांधींच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोरदार पलटवार केला. “राहुल गांधींनी थेट पुरावे द्यावेत. जर निवडणूक आयोगाने (Election Commission) त्यांचे ऐकले नाही तर त्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावावा. फक्त आरोप करून लोकांमध्ये संभ्रम पसरवणे योग्य नाही” असे ते म्हणाले. त्यांनी स्पष्ट केले की काँग्रेस जिंकते तेव्हा राहुल गांधी कोणतेही आरोप करत नाहीत, पण पराभव झाल्यावरच ते मतचोरीचे हत्यार वापरतात. ( Rahul Gandhi Vote Rigging)
शिंदे यांनी कर्नाटकमधील आलन मतदारसंघाचा उल्लेख करत काँग्रेसला कोंडीत पकडले. “त्या मतदारसंघात भाजप नव्हे तर काँग्रेसचाच उमेदवार भोजराज पाटील विजयी झाला. जर मतचोरी झाली असेल तर ती काँग्रेसने केली की भाजपाने?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Eknath Shinde | ईव्हीएमवर शिंदेंची प्रतिप्रश्नांची सरबत्ती :
राहुल गांधींच्या आरोपांदरम्यान ईव्हीएमचाही (EVM) मुद्दा पुढे आला. त्यावर शिंदे यांनी ठणकावून उत्तर दिले – “ईव्हीएम ही पद्धत काँग्रेसच्या यूपीए सरकारच्या काळात सुरू झाली. तेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान होते. मग आता राहुल गांधींना म्हणायचंय का की त्यांच्या सरकारने चुकीची प्रक्रिया सुरू केली?” असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, राहुल गांधींनी केलेले सर्व आरोप केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळून लावले आहेत. त्यामुळे आता काँग्रेसकडून पुढील काय पाऊल उचलले जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






