तुम्ही रॉयल्टी चोरी करता, तोंड काळ का केलं? भाजपच्या ‘या’ नेत्याचा खडसेंना सवाल

On: December 21, 2024 11:10 AM
Eknath Khadse
---Advertisement---

Eknath Khadse l राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच आता जळगाव जिल्ह्याच्या दोन बड्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. सध्या विधानपरिषदेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी एका चर्चेदरम्यान एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याचे राजकारण तापले आहे.

सरकार वाळू माफियांवर कारवाई का करत नाही? :

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांनी अगदी व्यक्तीगत पातळीवर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. यावेळी एनाथ खडसे यांनी जळगावामध्ये अवैध धंदे कोणाच्या आशिर्वादाने सुरु आहेत? असा सवाल उपस्थित केला होता. मात्र त्यावर गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या कुटुंबातील लोकांना तीन वर्ष जेलमध्ये काढावी लागली आहेत असं उत्तर दिलं. मात्र त्यानंतर सभागृहात प्रचंड तणावाचं वातावरण पसरलं होत.

याशिवाय सध्या वाळू माफियाची प्रकरण मोठ्या प्रमाणात घडत आहेत, मात्र यामागे कोणाचा हात आहे? तसेच सरकार पाच वर्ष तुमचं होतं, तरी देखील सरकार वाळू माफियांवर कारवाई का करत नाही? तसेच सरकारने बांगड्या घातल्यात का? याशिवाय वाळू माफियासंदर्भात तुम्ही बांगड्या घातल्या आहेत का? तसेच सरकारला कारवाई करता येत नाही? याशिवाय कापसाला भाव का देत नाही? तसेच सरकार मोठमोठ्या घोषण करता आहे, मग सरकारला कापसाला भाव देता येत नाही, कापसासाठी शेतकरी मरत आहे असे अनेक सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केले आहेत.

Eknath Khadse l मग छाती ठोकपणे बडबड का करायची? :

मात्र एकनाथ खडसेंच्या या प्रश्नांवर भाजप आमदार गिरीश महाजन यांनी तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, “चाललं काय, काय बरोबर चाललय. तुम्ही रॉयल्टी चोरी करता, स्टॅम्प ड्युटीमध्ये देखील तुम्ही चोरी करता. घरची लोकं तीन-तीन वर्ष जेलमध्ये बसलेत, त्यामुळे अजून काय इथे छाती ठोकपणे बडबड करायची, अहो चोऱ्या कोणी केल्या?” असं रोखठोकपणे महाजन म्हणाले आहेत.

याशिवाय तुमच्या घरात त्यावेळी नेमकं काय झालं? तसेच तुमच्या पोराला का मारलं? का तोंड काळ केलं? मात्र मी तर म्हणतो याप्रकरणाची नार्को टेस्ट करा असे व्यक्तीगत आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे. मात्र त्यांच्या या आरोप-प्रत्यारोपामुळे पुन्हा एकदा राज्यच राजकारण तापलेलं दिसून येत आहे.

News Title – Eknath Khadse vs Girish Mahajan

महत्त्वाच्या बातम्या-

मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या शुक्लाला पोलिसांकडूनच VIP ट्रीटमेंट?, मोठा खुलासा समोर

बीडचं राजकारण तापणार?, शरद पवार आज मस्साजोग दौऱ्यावर

“माझ्या बाबांना ज्या प्रकारे मारलं, तशीच शिक्षा…”; संतोष देशमुखांच्या मुलीचा टाहो

इंधनदरात दिलासा! पेट्रोल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या लेटेस्ट दर

मेष ते मीन आज शनिदेव कोणत्या राशींवर ठेवणार कृपादृष्टी?, वाचा राशीभविष्य

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now