लोकसभेत ‘हायव्होल्टेज’ ड्रामा! महाराष्ट्रातील ‘या’ खासदारासह ८ जणांची हकालपट्टी

On: February 3, 2026 7:07 PM
Loksabha Suspension
---Advertisement---

Loksabha Suspension | संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज लोकसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भाषणादरम्यान परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. या प्रकारानंतर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी कठोर भूमिका घेत आठ विरोधी खासदारांना थेट निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

सभागृहात गोंधळ, अध्यक्षांची कठोर कारवाई :

आज सकाळी लोकसभेत चर्चेदरम्यान काही खासदारांनी सभापतींच्या व्यासपीठावर कागदपत्रे फेकली आणि टेबलांवर चढून घोषणाबाजी केली. त्यामुळे संसदेचे कामकाज विस्कळीत झाले होते. या गदारोळानंतर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी तातडीने हस्तक्षेप करत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी आठ खासदारांना निलंबित केले. या निर्णयामुळे संबंधित खासदार आता या अधिवेशनात सहभागी होऊ शकणार नाहीत.

निलंबन झालेल्या खासदारांमध्ये महाराष्ट्रातील भंडारा (Bhandara) मतदारसंघाचे खासदार प्रशांत पडोळे (Prashant Padole) यांचाही समावेश आहे. सभागृहात कागदपत्रे फेकणे तसेच सभापतींच्या आसनाचा अवमान केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच अमरिंदर सिंग राजा वारिंग (Amarinder Singh Raja Warring), डीन कुरियाकोसे (Dean Kuriakose), किरण कुमार रेड्डी (Kiran Kumar Reddy), माणिकम टागोर (Manickam Tagore), गुरजीत सिंग औजला (Gurjeet Singh Aujla), हिबी एडन (Hibi Eden) आणि एस. वेंकटेश्वरन (S. Venkateswaran) यांनाही निलंबनाचा सामना करावा लागला आहे.

Loksabha Suspension | चीन मुद्द्यावरून वाद, राजकीय प्रतिक्रिया तीव्र :

लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चीन (China) संदर्भातील मुद्दा उपस्थित केल्यानंतर वातावरण अधिक तापले. सकाळी कामकाज ठप्प झाल्यानंतर दुपारी 2 वाजता सभागृह पुन्हा सुरू झाले, तेव्हा राहुल गांधी यांनी भाषणात चीन-अमेरिका (China-US) कराराचा विषय पुन्हा मांडला. मात्र सभापतींनी त्यांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलण्याचे वारंवार निर्देश दिले. राहुल गांधी यांनी त्याकडे दुर्लक्ष करत चीनचा मुद्दा मांडत राहिल्याने अखेर सभापतींनी त्यांना बोलण्याची परवानगी नाकारली.

यानंतर विरोधी पक्षातील काही खासदारांनी टेबलांवर चढून घोषणाबाजी केली आणि सभापतींच्या व्यासपीठाकडे कागदपत्रे फेकली, ज्यामुळे मोठा गोंधळ उडाला. या घटनेनंतर काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल (KC Venugopal) यांनी प्रतिक्रिया देताना राहुल गांधी आपले कर्तव्य बजावत असून सरकार त्यांना रोखत असल्याचा आरोप केला. त्यांनी सरकारने केवळ काँग्रेसच नव्हे तर संपूर्ण विरोधकांनाच निलंबित करावे, असेही म्हटले. दरम्यान, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी या निलंबनप्रकरणी लोकसभाध्यक्षांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

News Title: Eight MPs Suspended in Lok Sabha

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now