Shreyas Iyer | ‘गंदी बात’ फेम अभिनेत्री एडिन रोज (Edin Rose) हिनं अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत क्रिकेटपटू श्रेयस अय्यरवर (Shreyas Iyer) असलेल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. विशेष म्हणजे, तिनं स्वतःला त्याच्या मुलांची आईही म्हटलं आहे.
एडिन रोज, ही ‘गंदी बात’ या वेब सीरिजमुळे ओळखली जाणारी अभिनेत्री, सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. तिनं अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत, “माझ्या मनात, मी श्रेयस अय्यरशी लग्न केलंय. आणि हो, मी त्याच्या मुलांची आईसुद्धा आहे,” असं धक्कादायक विधान केलं आहे. या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांमध्ये चर्चेला नवा रंग चढला आहे. (Edin Rose)
बिग बॉस, गंदी बात आणि अभिनय प्रवास :
एडिन रोजचं नाव सध्या सर्वत्र चर्चेत असताना, तिचा बायोडेटा अनेकांना उत्सुकतेने जाणून घ्यायचा आहे. तिचा जन्म २० ऑगस्ट १९९८ रोजी दुबईमध्ये झाला. वडील बर्माचे असून तमिळ वंशाचे आहेत आणि आई कर्नाटकातील आहे. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.
२० वर्षांची असताना ती करिअरसाठी दुबईहून मुंबईला आली. २०२० मध्ये ‘गंदी बात’ या वेब सिरीजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ‘गुड गर्ल्स – ब्राइड्स नाईट’ आणि ‘हेल्प मी’ या प्रोजेक्ट्समध्येही ती झळकली. याशिवाय, ‘रावणासुर’ या चित्रपटातही ती दिसली होती. (Shreyas Iyer)
Edin Rose | सोशल मीडियावर चर्चेचा विषय :
एडिन रोज बिग बॉस १८ या शोमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे सहभागी झाली होती. तेव्हापासून ती सोशल मीडियावर सक्रिय राहते. तिचे ग्लॅमरस फोटो आणि वक्तव्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. (Edin Rose)
श्रेयस अय्यरबाबत केलेल्या वक्तव्यानंतर, अनेकांनी ती मजेशीरपणे बोलत असल्याचं म्हटलं असलं तरी काही चाहत्यांनी हे विधान गांभीर्याने घेतलं आहे. सध्या दोघांच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.






