ईडीची मोठी कारवाई! ‘या’ सोसायटीची 333 कोटींची मालमत्ता जप्त

On: November 9, 2024 2:13 PM
ED attach property
---Advertisement---

ED attach property l विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार सुरु आहे. अशातच अमंलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. बीड जिल्ह्यात मुख्यालय असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को- ऑपरेटीव्ह सोसायटीवर ईडीने ही करवाई केली आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

ईडीची मोठी कारवाई :

यासंर्दभात अधिक माहिती अशी की, आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने सोसायटीची तब्ब्ल 333 कोटी 82 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. तसेच या प्रकरणात 49 गुन्हे देखील दाखल झाले आहे. याप्रकरणी ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये सुरेश कुटे यांच्या कुटे डेअरी व कुटे सन्स फ्रेश डेअरी या कंपन्यांच्या इमारती, प्रकल्प, जमिनी आणि मशिनरीचा समावेश केला आहे.

दरम्यान, या मालमत्ता सातारा व अहिल्यानगर जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली आहे. कारण सध्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को- ऑपरेटीव्ह सोसायटीचे अध्यक्ष सुरेश कुटे व उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी हे कारागृहात आहेत.

ED attach property l नेमकं प्रकरण काय? :

याप्रकरणी सुरेश कुटे यांनी ज्ञानराधा मल्टीस्टेट को- ऑपरेटीव्ह सोसायटीमध्ये तब्ब्ल 2318 कोटी रुपयांचा अपहार केला आहे. यासोबतच त्यांनी ते पैसे आपल्या अन्य कंपन्यांत कर्ज रूपाने वळवल्याचा ठपका ईडीने त्यांच्यावर ठेवला आहे. मात्र हे पैसे नंतर रोखीने काढून घेत त्याद्वारे त्यांनी वैयक्तिक मालमत्तांची खरेदी केल्याचे देखील तपासात दिसून आले आहे.

मात्र हे प्रकरण मनी लॉड्रिग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. तसेच या सोसायटीच्या महाराष्ट्रासह देशातील इतर शहरांमध्ये एकूण मिळून 50 शाखा आहेत. तसेच या सोसायटीमध्ये पावणेचार लाख ठेवीदारांच्या ठेवी देखील होत्या. यावेळी एकूण 3000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम ठेवीदारांची अडकली असल्याची माहिती मिळाली आहे.

News Title –  ED attach Gnanaradha Multistate Co operative Society property

महत्त्वाच्या बातम्या-

नेट पॅक नसेल तरी ऑनलाईन पैसे पाठवता येणार!

नागरिकांना पुन्हा लावावे लागणार मास्क, कारण…

‘चाटूगिरी करणारे..’, ED चा उल्लेख करत राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

संजय राऊतांनी केला सर्वात मोठा खळबळजनक आरोप!

‘या’ तारखेनंतर राज्यात थंडीचा कडाका वाढणार; IMD कडून महत्वाचा इशारा

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now