सावधान! पुण्यात टँकरच्या पाण्यात आढळला ‘ई-कोलाय’ जीवाणू; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

On: January 31, 2025 5:41 PM
Pune News
---Advertisement---

Pune News l सिंहगड (Sinhagad) रस्त्यावरील धायरी (Dhayari), नांदेड (Nanded) परिसरात ‘जीबीएस’ (GBS) या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिकेने (Municipal Corporation) या भागातील १५ टँकर पॉईंट (Tanker Point) चालकांच्या जलस्रोतातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. यातील एका ठिकाणच्या नमुन्यात ‘ई-कोलाय’ हा घातक जीवाणू आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

या पार्श्वभूमीवर, महापालिकेने सर्व टँकर चालकांना टँकरमध्ये जंतुनाशक पावडर मिसळण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी देखील पाणी वापरताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टँकरमध्ये जंतुनाशक पावडर टाकण्याच्या सूचना :

बुधवारी महापालिकेने या परिसरातील सर्व टँकर पॉईंट मालकांची बैठक बोलावून त्यांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. टँकर भरताना त्यात सहा ग्रॅम जंतुनाशक पावडरचे द्रावण मिसळण्याचे निर्देश देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र, एकाच टँकर पॉईंट चालकाने ही पावडर नेल्याचे समोर आले आहे. यामुळे उर्वरित टँकर पॉईंट चालकांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा (Water Supply) विभागप्रमुख नंदकिशोर जगताप (Nandkishor Jagtap) यांनी दिली.

खडकवासला (Khadakwasla) धरणातून बंदिस्त जलवाहिनीतून येणारे प्रक्रिया न केलेले कच्चे (रॉ वॉटर) (Raw Water) पाणी या विहिरीत (Well) साठवले जाते. त्यानंतर पालिकेतर्फे या विहिरीत फक्त जंतुनाशक पावडर टाकून हे पाणी संबंधित गावांना वितरित केले जाते. मात्र, ही प्रक्रिया नियमितपणे होत नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती.

Pune News l नागरिकांना सतर्कतेचा इशारा :

‘ई-कोलाय’ जीवाणू आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी पाणी पिताना ते उकळून व गाळून पिण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच, टँकरचे पाणी वापरताना ते स्वच्छ असल्याची खात्री करून घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या भागात पोटाच्या विकारांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे, त्याचा परिणाम पुढे जाऊन जीबीएस सारख्या मोठ्या आजारात होत आहे, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. पोटाचे विकार किंवा अन्य काही तक्रारी जाणवल्या तर त्या अंगावर न काढता त्वरित जवळच्या डॉक्टरांना दाखवून घ्यावे, असं आवाहान नांदेड सिटीतील कोरडेबाग येथील वर्पे क्लिनिकच्या (Varpe Clinic, Nanded City) डॉ. अश्विनी पाटील-वर्पे यांनी केलं आहे.

दरम्यान, सिंहगड रस्त्यावरील काही परिसरात ‘जीबीएस’ (Guillain Barre Syndrome) चे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर, या भागातील पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

News Title: E. coli Bacteria Found in Pune Tanker Water, Alert Issued

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now